घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं बॉलिवूडमधील या कलाकारांचं नातं, पण ऐनवेळी बदललं मन, त्यानंतर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 12:28 IST
1 / 6वैवाहिक जीवनात अडचणी येण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मनोरंजन जगतातील अनेक स्टार्सचे संसार काही वर्षांनंतर मोडण्याच्या पातळीवर पोहोचतात. मात्र सिनेजगतात अशीही काही जोडपी आहेत ज्यांनी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर जाऊन आपला संसार वाचवला आहे. 2 / 6टीव्ही सिरियलमधील स्टार चारू असोपा आणि राजीव सेन यांचं वैवाहिक जीवन हे चढ उतारांनी भरलेलं आहे. लग्नानंतर दोनवेळा या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर हा निर्णय मागे घेत त्यांनी नात्याला आणखी एक संधी दिली. 3 / 6दक्षिणेतील स्टार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरून वेगळे होण्याची घोषणा केली होती. नंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचा विवाह वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावली. आता या दोघांनीही आपल्या विवाहाला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.4 / 6बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याची पत्नी आलिया यांचाही घटस्फोट होणार होता. आलियाने नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले होते. मीडियावरही चर्चा रंगल्या. मात्र नंतर त्यांनी नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेत पुन्हा एकत्र आले. 5 / 6महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांनी लव्हमँरेज केले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र मीडियातील रिपोर्टनुसार पहिल्या मुलाच्या जन्मानंतर दोघांमध्ये मतभेद झाले होते. तसेच नम्रता आणि महेश बाबू वेगळे राहिले होते. त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर त्यांनी नात्याला दुसरी संधी दिली. 6 / 6दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या नात्यातही दुरावा आला होता. ऋषी कपूर यांच्या व्यसनाधीनतेमुळे नीतू कपूर नाराज होती. त्यांनी वेगळे होण्याच निर्णयही घेतला होता. मात्र नंतर त्यांच्यातील वाद मिटला आणि ते अखेरपर्यंत एकत्र राहिले.