Sonalee Kulkarni : मराठी सिनेविश्वातील 'अप्सरा' रुपेरी पडद्यापासून आहे गायब, ती सध्या आहे कुठे?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:41 IST
1 / 9अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने सिनेमात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. 2 / 9सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. 3 / 9सोनाली कुलकर्णी बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावरून गायब आहे. 4 / 9सोनाली शेवटची मलाइकोट्टाई वालिबान या मल्याळम सिनेमात झळकली आहे. तेव्हापासून ती रुपेरी पडद्यावर काम करताना दिसली नाही.5 / 9सध्या सोनाली कुलकर्णी परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. 6 / 9सोनाली सध्या जपानमध्ये फॅमिलीसोबत फिरते आहे आणि तिथले फोटो शेअर करताना दिसते आहे. 7 / 9नुकतेच तिने जपानमधील हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कमधील फोटो शेअर केले आहेत.8 / 9या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.9 / 9सोनाली कुलकर्णी लवकरच 'महाराणी ताराराणी' आणि 'रावसाहेब' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.