Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक आयुष्याविषयी होणाऱ्या चर्चांवर उर्मिला कानिटकरने सोडलं मौन; म्हणाली, "काही खरं.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:26 IST

1 / 8
मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. २००३ साली तिने 'तुझ्याविना' या मराठी मालिकेतून पदार्पण केलं.
2 / 8
सध्या उर्मिलाचं 'फिल्टर कॉफी' हे नाटक सुरु आहे. शिवाय 'पुन्हा घाशीराम कोतवाल' नाटकातही तिची छोटी भूमिका आहे.'बाईपण जिंदाबाद' या मालिकेच्या एपिसोड्समध्येही ती दिसत आहे.
3 / 8
उर्मिला आजही दिसायला निरागस, सुंदर आहे. तिला ७ वर्षांची जिजा ही मुलगी आहे. लेकीच्या जन्मानंतरही उर्मिला स्वत:ला योगाच्या माध्यमातून मेंटेन ठेवलं आहे.
4 / 8
वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांवर आता उर्मिलाने मौन सोडलं आहे. तसंच ट्रोलिंगवरही तिने उत्तर दिलं आहे.
5 / 8
'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला म्हणाली, 'ट्रोलिंगचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी कमेंट्स वाचतच नाही. कमेंट्समध्ये लोक खूप टॉक्झिक असतात त्यामुळे मी लक्ष देत नाही.'
6 / 8
'तसंही माझ्याकडे इतर खूप व्याप असतात त्यामुळे कोण माझ्याबद्दल काय बोलतंय याकडे लक्ष देण्यात मला रस नसतो. इंटरनेटवर आपल्याबद्दल काय बोललं जातंय याकडे लक्ष द्यायचं नसतं.'
7 / 8
'ज्या गोष्टी इंटरनेटवर फिरत असतात त्यातल्या काही खऱ्या असतात तर काही खोट्या असतात. प्रेक्षकांना एकच सांगेन तुमच्यापर्यंत जे पोहोचतंय ते सगळं खरंच आहे असं मानून चालू नका. त्यातलं काही खरं असेल तर काही खोटंही असू शकतं.'
8 / 8
'जिजाला आम्ही सोशल मीडिया वगैरेपासून दूरच ठेवलं आहे. अगदी युट्यूबही पाहू देत नाही. ओटीटी शोज आमच्याकडे आता जास्त पाहिले जातात.'
टॅग्स :उर्मिला कानेटकर कोठारेआदिनाथ कोठारेमराठी अभिनेता