Join us  

कोण आहेत चिंकी-मिंकी? जाणून घ्या कलाविश्वात धुमाकूळ घालणाऱ्या जुळ्या बहिणींची खरी नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 3:20 PM

1 / 8
चिंकी-मिंकी (Chinky Minky) या जुळ्या बहिणींना आज कोणी ओळखत नाही असं म्हणणारे फार क्वचितच असतील. इंटरनेटवर सध्या या बहिणी धुमाकूळ घालत आहेत.
2 / 8
'द कपिल शर्मा' या शोमध्ये आल्यानंतर चिंकी-मिंकी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या. इतकंच नाही तर त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.
3 / 8
टिकटॉक स्टार ते सेलिब्रिटी असा प्रवास करणाऱ्या चिंकी -मिंकी नेमक्या आहेत तरी कोण ते जाणून घेऊयात.
4 / 8
सध्या चिंकी-मिंकी सोशल मीडिया सेन्शन आहेत. त्यांचा कोणत्याही व्हिडीओ क्षणार्थात वाऱ्यासारखा व्हायरल होतो.
5 / 8
टिकटॉकपासून सुरुवात करणाऱ्या या दोन बहिणींनी कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे.
6 / 8
चिंकी आणि मिंकी या दोघींचं खरं नाव सुरभ‍ी मेहरा (Surabhi Mehra) आणि समृद्ध‍ी मेहरा (Samriddhi Mehra) आहे. परंतु, त्यांची ही खरी नावं फार कमी जणांना माहित आहेत.
7 / 8
२७ डिसेंबर १९९८ मध्ये या दोघींचा जन्म नोएडामध्ये झाला.
8 / 8
चिंकी-मिंकीचं एक युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यमातून आता त्या अनेक सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यूज घेत असतात. तसंच स्वत:चे काही व्हिडीओ कंटेन्टही शेअर करतात.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनकपिल शर्मा