1 / 8प्रेग्नंसी फोटोशूटचा ट्रेंड हा हल्लीचाच आहे. आजवर सोशल मीडियावर कितीतरी पद्धतीने केलेले हे फोटोशूट व्हायरल झाले आहेत2 / 8गेल्या काही वर्षात अनेक सेलिब्रिटींनी गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्रींचं मॅटर्निटी फोटोशूट नेहमीच चर्चेत आलं. प्रत्येक जण काहीतरी हटके करत असतो.3 / 8कोणी पारंपरिक पद्धतीने तर कोणी अगदीच रिव्हीलिंग पद्धतीने हे शूट करतं. अर्थात सगळ्यांच्याच शूटमध्ये वेगळी सुंदरता असते.4 / 8हिंदी मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री आशका गोराडियाने नुकताच दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्याआधी तिचं मॅटर्निटी फोटोशूट व्हायरल झालं होतं.5 / 8आशकाचा नवरा ब्रेंट गॉबल हा योग प्रॅक्टिशनर आणि प्रशिक्षक आहे. दोघांनी समुद्रकिनारी योगाच्या एका आसनामध्ये हे फोटोशूट केलं आहे6 / 8आशकाने कॅप्शन देत लिहिलेले,'असे काही क्षण जे मी कधीच बदलणार नाही - वेळ कोणतीही असो किंवा मी कोणत्याही परिस्थितीत असो'7 / 8ब्रेंटने आशकाचं संपूर्ण वजन त्याच्या दोन पायांवर पेललं आहे. तर आशका प्रेग्नंसीच्या अवस्थेतही त्याच्या पायांवर ताठ बसून आसन करत आहे. यात तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.8 / 8पहिल्या बाळाच्या जन्माआधीचंही आशकाचं प्रेग्नंसी शूट खूप व्हायरल झालं होतं. त्यांनी जंगलात अगदी बोल्ड स्वरुपात ते फोटोशूट केलं होतं.