1 / 7टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कलाकार आज स्क्रीनवरुन गायब झाले आहेत. काहींनी अनेक वर्षांनी कमबॅकही केलं आहे.2 / 7ही अभिनेत्री आहे आमना शरीफ (Aamna Sharif). सुंदर चेहरा, गोड स्माईल यामुळे आमनाच्या सौंदर्यावर चाहते फिदा असायचे. बऱ्याच वर्षांनी ती पुन्हा स्क्रीनवर दिसणार असल्याची चर्चा आहे.3 / 7अशीच एक अभिनेत्री जी एकेकाळी मालिकांमध्ये रोमँटिक भूमिकांमध्ये दिसायची. तिच्या आता कमबॅकच्या चर्चा आहेत. तसंच या चर्चांमध्ये तिचं फोटोशूटही व्हायरल होत आहे.4 / 7आमना 'कही तो होगा' या मालिकेमुळे लोकप्रिय झाली होती. यामध्ये तिची जोडी राजीव खंडेलवालसोबत होती. त्यांची जोडी सुपरहिट झाली होती. 5 / 7आता हीच जोडी पु्न्हा एकत्र येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाहतेही भलतेच खुश झालेत आणि त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.6 / 7यादरम्यान आमनाचं फोटोशूटही व्हायरल होत आहे. व्हाईट ब्लाऊज आणि निळ्या साडीत ती जणू अप्सराच दिसत आहे. आजही वयाच्या ४२ व्या वर्षी तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे. 7 / 7तिचा हा बॅकलूक तर घायाळ करणारा आहे. यात ती तिचा कमरपट्टा फ्लॉन्ट करत आहे. 'तुझ्यासारखी अजून कोणीच नाही','लवकर कमबॅक कर आमना' अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत.