Join us

'तू माझा सांगाती'मधील भानूबाई खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 07:00 IST

1 / 16
मालिका व नाटक या माध्यमात अभिनेत्री वैशाली राहुल भोसले हिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.
2 / 16
बालपणापासूनच वैशालीला अभिनयाची आवड होती. आई वडिलांसोबत थिएटरमध्ये पहिला सिनेमा मैंने प्यार किया पाहिला आणि तेव्हापासून तिला अभिनेत्री भाग्यश्रीसारखे बनण्याचा ध्यास लागला.  
3 / 16
त्या काळात जे जे सिनेमे पाहिले त्या त्या सिनेमा मधली हीरोईन व्हायचं स्वप्न पाहतच ती मोठी झाल्याचे वैशाली सांगते. 
4 / 16
अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी सुरूवातीला वैशालीला घरातून विरोध होता. पण नंतर तिने अभिनय क्षेत्रात करियर करायचे मनाशी पक्के केले. 
5 / 16
अभिनय क्षेत्रातील तिच्या कारकीर्दीची खरी सुरूवात तिच्या शालेय जीवनातून झाली. तिने शाळेत लग्नाची बैठक या नाटकात काम केले. त्यानंतर दिशा या पथनाट्य ग्रुपमधून 2 वर्ष तिने काम केले.
6 / 16
वैशालीची मराठी सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून झाली. ई टीव्हीवरील ब्रह्मांडनायक या गजानन महाराजांवर आधारित मालिकेत काम केले. त्यानंतर जवळपास सगळ्याच चॅनेलवर छोट्या मोठ्या भूमिका तिने केल्या.
7 / 16
तिने दूरदर्शनवरील 1-2 मालिकांमध्ये काम केली. तसेच स्टार प्रवाहवरील लक्ष्य मालिकेचे अनेक एपिसोड केले. स्टार प्रवाह वरील बंध रेशमाचे मालिकेत कैरेक्टर रोल केले. 
8 / 16
झी मराठी वाहिनीवरील आभास हा, अस्मिता या मालिकांमध्येही वैशालीने काम केले आहे. तसेच झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिएलिटी शोमध्येदेखील ती सहभागी झाली होती.
9 / 16
कलर्स मराठी वरील तू माझा सांगाती मालिकेत तिने भानुबाई आणि द्वारकाची भूमिका केली.
10 / 16
तिने या मालिकेत साकारलेले दोन्ही पात्र निगेटिव्ह होते. पण, या मालिकेतील भानूबाईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील भानुबाई या भूमिकेने तिला घराघरात ओळख दिल्याचे वैशाली सांगते.
11 / 16
मिलिंद शिंदे लिखित दिग्दर्शित नाच तुझंच लगिन हाय या सिनेमात काम केले.
12 / 16
तसेच आगामी रमेश मोरे लिखित आणि दिग्दर्शित टॉपर या सिनेमातही ती झळकणार आहे.
13 / 16
याशिवाय वैशालीने हृषिकेश कोळी लिखित-दिग्दर्शित वर खाली दोन पाय या प्रायोगिक नाटकाची निर्मिती करत निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. 
14 / 16
कथ्थकमध्ये डिप्लोमा करत असलेली वैशाली लवकरच क्लासिकल नृत्यावर आधारित एका नाटकात काम करताना दिसणार आहे.
15 / 16
श्रमेश बेटकर लिखित आणि दिग्दर्शित एका नाटकातही ती काम करताना दिसणार आहे. लॉकडाउनआधी या नाटकाची तालीम सुरु होती. पण नाट्यगृह सुरू झाल्यावर हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
16 / 16
लॉकडाउनमध्ये बोल मराठी या युटयूब चॅनेलवर रमेश मोरे लिखित-दिग्दर्शित माझी रोजनिशी या सदरात थँक्यू बाबा या भागातही तिने काम केले. याशिवाय निर्मिती क्षेत्रात एक नवा उपक्रमही ती घेऊन येणार आहे. 
टॅग्स :टेलिव्हिजन