Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी टेलिव्हिजनवरील ही अभिनेत्री ठरली महाराष्ट्राची नंबर वन, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:46 IST

1 / 7
मालिकांमध्ये नेहमीच टीआरपीची रेस चालू असते. मालिकांच्या क्षेत्रात वेगवेगळ्या मालिकांचे नाव पहिल्या स्थानावर येत असते. मात्र यात सर्वात जास्त काळ पहिल्या स्थानावर राहणारी मालिका आई कुठे काय करते आहे. मात्र गेल्या काही दिवसांत आता यातही बदल होताना दिसत आहे.
2 / 7
ज्याप्रमाणे मालिकांमधील टीआरपीची रेस चालू असते त्याच प्रमाणे मराठी मालिकांमधील अभिनेत्रींमध्ये देखील ही स्पर्धा सुरू असते. कोणत्या अभिनेत्रीने महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
3 / 7
यात पाचव्या स्थानावर फुलाला सुगंध मातीचा मधील समृद्धी केळकर आहे.
4 / 7
सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेतील गिरीजा प्रभू चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत आता नवीन वळण आले असून लवकरच गौरी एक आनंदाची बातमी शिर्के पाटील तसेच प्रेक्षकांना देखील देणार आहे.
5 / 7
प्रार्थना बेहरे सध्या माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत काम करत असून या मालिकेने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रार्थना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
6 / 7
ठिपक्यांची रांगोळीमधील ज्ञानदा रामतीर्थकर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
7 / 7
मन उडू उडू झालं या मालिकेत दीपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने पहिले स्थान पटकावले आहे. गेल्या काही दिवसापासून मालिका रंजक वळणावर आली आहे.
टॅग्स :प्रार्थना बेहरेऋता दूर्गुळेआई कुठे काय करते मालिका