डोरेमॉन, शिनचॅनसारख्या प्रसिद्ध कार्टुन पात्रांना ही लोकं देतात आवाज, चेहरा पाहून बसणार नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 17:12 IST
1 / 6 विविध कार्टुन चॅनल्सवरील काही पात्रं ही बच्चेकंपनीच्या पसंतीस उतरलेली आहेत. डोरेमॉन, शिनचॅन ही त्यापैकीच काही पात्रं आहेत. या पात्रांना आवाज कोण देत असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आज आपण पाहुयात की या प्रसिद्ध पात्रांना नेमका कोण आवाज देतं ते. 2 / 6या आहेत प्रसिद्ध व्हाईस ओव्हर आर्टिस्ट सोनल कौशिक. त्या डोरेमॉन या मालिकेतील डोरेमॉन आणि पिचाकू या पात्रांना आवाज देतात. त्यांचे इस्टाग्रामवर ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 3 / 6या आहेत आकांक्षा शर्मा. त्या बच्चे कंपनीमध्ये प्रसिद्ध असलेले कार्टुन कॅरॅक्टर शिनचॅन याला आवाज देतात. त्यांनी अनेक चित्रपटांची डबिंगसुद्धा केली आहे. 4 / 6व्हाईस ओव्हर आर्टिस्ट पारुल भटनागर ह्या डोरेमॉन मालिकेतील प्रसिद्ध पात्र शिझुका ला आवाज देतात. त्या गेल्या १५ वर्षांपासून आवाजाच्या जगात कार्यरत आहेत. 5 / 6या आहेत पल्लवी. त्यांनी डोरेमॉन मालिकेतील अनेक पात्रांना आपला आवाज दिला आहे. त्यामध्ये देगीसूची, नोबिताची आई, जिऑनची आई, जिऑनची बहीण यांना आवाज दिला आहे. 6 / 6लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कार्टुन पात्रं आवडतात. या पात्रांचा आवाज बनून हे व्हाईस ओव्हर आर्टिस्ट पडद्यामागे राहत घराघरात पोहोचतात.