By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:00 IST
1 / 9तेजश्री प्रधान हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तेजश्रीने काम केलं आहे. 2 / 9होणार सून मी ह्या घरची मालिकेतून तेजश्रीला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तेजश्री अग्गबाई सासूबाई, प्रेमाची गोष्ट या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसली. 3 / 9सध्या तेजश्री झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेत ती स्वानंदीची भूमिका साकारत आहे. 4 / 9'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत स्वानंदी आणि समरचं नुकतंच लग्न झालं आहे. या लग्नाच्या ट्रॅकला चाहत्यांनीही पसंती दर्शवली. 5 / 9'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत लग्न लागताच स्वानंदीच्या मंगळसूत्राची चर्चा रंगली आहे. स्वानंदीने घातलेल्या मंगळसूत्राने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 6 / 9या मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत असलेल्या तेजश्रीने हटके मंगळसूत्र घातलं आहे. दोन लेयर असलेलं हे मंगळसूत्र अतिशय छान आहे. 7 / 9यामध्ये एका बाजूला चेन आणि दुसऱ्या बाजूला काळे मणी तर मध्ये पेंडंट अशी खास डिझाइन केली आहे. 8 / 9याआधी तेजश्रीने साकारलेल्या जान्हवीच्या मंगळसूत्राचा ट्रेंड आला होता. तीन लेअरचं जान्हवीचं मंगळसूत्र प्रचंड ट्रेंडिंग होतं. 9 / 9आता जान्हवीनंतर स्वानंदीच्या मंगळसूत्राचा ट्रेंड आल्याचं दिसत असून चाहत्यांचीही याला पसंती आहे.