Join us

जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:30 IST

1 / 8
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आणि घरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी.
2 / 8
लग्नानंतर प्रेग्नंसीमुळे दिशाने मालिकेतून ब्रेक घेतला होता. पण, ती परत 'तारक मेहता'मध्ये दिसलीच नाही.
3 / 8
प्रेक्षकांनी तिला खूप मिस केलं. शिवाय गोकुळधाम सोसायटीत जेठालालही तिच्या दयाला खूप मिस करत आहे.
4 / 8
पण, या दयाबेनचा रिअल लाइफ नवरा कोण हे तुम्हाला माहितीये का?
5 / 8
दिशा वकानीच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याचे नाव मयुर पाडिया असं आहे. ते जेठालालपेक्षाही खूपच साधे आहेत.
6 / 8
मयुर हे पेशाने चार्टर्ड अकाऊंटट आहेत. २०१५ मध्ये दिशा आणि मयुर यांनी लग्नगाठ बांधली.
7 / 8
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नातही दिशा आणि मयुर यांनी अगदी साधा लूक केला होता.
8 / 8
दिशा वकानीला २ मुलं आहेत. २०१७मध्ये तिने स्तुती या तिच्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर २०२२ मध्ये दिशाला पुत्ररत्न झालं.
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानीटिव्ही कलाकार