"तारक मेहता..." फेम रिटा रिपोर्टर मालिका सोडल्यावर सध्या काय करते? अभिनेत्रीने केलाय 'हा' अनोखा रेकॉर्ड
By देवेंद्र जाधव | Updated: November 27, 2025 10:22 IST
1 / 7'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत 'रीटा रिपोर्टर'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा रजदा (Priya Ahuja Rajda) आजही सर्वांना आठवत असेलच.2 / 7काही वर्षांपूर्वी रिटाने मालिकेला रामराम ठोकला. पण मालिका सोडल्यानंतर रिटाच्या नावे एक अनोखा रेकॉर्ड तयार झाला आहे. जाणून घ्या सविस्तर3 / 7प्रिया आहूजा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. प्रियाने अशीच एक खास अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.4 / 7प्रियाने 'वेटेड प्लँक' (Wighted Plank) या फिटनेस प्रकारात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तिने आपल्या पाठीवर तब्बल ७५ किलो वजन ठेवून काही मिनिटं ती त्याच अवस्थेत होती.5 / 7स्वतःच्या ४० व्या वाढदिवशी काहीतरी खास करायचे होते, अशी माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली. आई झाल्यावर किंवा चाळीशीनंतर अनेक गोष्टी करणे कठीण होते, असा लोकांचा गैरसमज असतो, जो मला मोडायचा होता, असे ती म्हणाली.6 / 7विशेष म्हणजे, प्रियाने केवळ एका आठवड्यात २० किलोवरून ७५ किलो वजन उचलण्याची तयारी केली. प्रियाच्या या रेकॉर्डमध्ये तिच्या पतीने तिला साथ दिली.7 / 7७५ किलो वजन पाठीवर पेलल्यानंतर प्रियाला महिलांच्या प्रियाने नवीन विक्रम केला आहे. प्रियाच्या या रेकॉर्डमुळे सर्वांनी तिचं अभिनंदन केलं.