‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची माधवी भाभी ख-या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस, फोटो पाहाल तर व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 13:03 IST
1 / 10‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. पण भिडे वहिनी अर्थात माधवी भाभीची गोष्ट काही औरच. ख-या आयुष्यात माधवी भाभी प्रचंड ग्लॅमरस आहेत.2 / 10माधवीचे मराठी बोलणे तर प्रेक्षकांना खूप भावते. या मालिकेत मंदार चांदवलकर आत्माराम भिडेची तर सोनालिका जोशी माधवी भिडेची भूमिका साकारते. 3 / 10सोनालिका ही एक मराठी मुलगी असून तिने मराठी रंगभूमीपासूनच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.4 / 10‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने तिच्या कारकिर्दीला एक वेगळेच वळण मिळवून दिले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 5 / 10आज प्रेक्षक सोनालिकाला माधवी याच नावाने ओळखू लागले आहेत. 6 / 10सोनालिका ही खूपच चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक लेखिका देखील आहे. तिला लिखाण करायला खूपच आवडते.7 / 10सोनालिकाला गाड्यांची प्रचंड आवड आहे.8 / 10सोनालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसठी रोज 25 हजार रूपये फी घेते.9 / 10गेल्या 12 वर्षांपासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करतेय.10 / 10सोनालिका विवाहित आहे. 5 एप्रिल 2004 रोजी तिने समीर जोशीशी लग्न केले. तिला आर्या नावाची एक मुलगी आहे.