By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:02 IST
1 / 8'बिग बॉस मराठी सीझन ६'मध्ये यावेळी वेगवेगळे सेलिब्रिटी दिसत आहेत. रील स्टार्स, कलाकार, कॉमेडी स्टार अशा लोकांची मांदियाळी आहे.2 / 8गेल्या वेळी निक्की तांबोळीने सीझन गाजवलं होतं. तर यावेळी तिच्यासारखीच एक मॉडेल म्हणून सोनाली राऊतने घरात प्रवेश केला आहे. 3 / 8सोनाली राऊत सध्या बिग बॉसच्या घरात काहीच काम करताना दिसत नाही. यामुळे रितेशने तिला मागच्या आठवड्यात चांगलंच सुनावलं होतं. 4 / 8सोनाली राऊत ही अभिनेत्री आहे हे सगळ्यांना माहितच आहे. पण तिचे वडील हे मुंबईचे डेप्युटी पोलिस कमिशनर होते हे माहितीये का?5 / 8सोनालीने अनेकदा तिच्या पोस्टमधून वडिलांचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते वर्दीत दिसत आहेत. ती वडिलांसाठी पोस्ट करताना नेहमी 'माय हिरो' असं संबोधते. 6 / 8तसंच तिने आईसोबतचेही फोटो शेअर केले आहेत. सोनालीचं कुटुंबावर खूप प्रेम आहे. बिग बॉस ८ मध्ये सहभागी होताना तिच्या आईवडिलांनी सुरुवातीला तिला विरोध केला होता. मात्र नंतर त्यांनी होकार दिला असं तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं. 7 / 8तर सोनालीला एक मोठी बहीण आहे जिचं नाव उज्वला राऊत आहे. उज्वला एकेकाळची प्रसिद्ध मॉडेल राहिली आहे. तिचं आयुष्य खूप चर्चेत होतं. अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत तिचे फोटो आहेत.8 / 8सोनाली राऊतने हिमेश रेशमियासोबत 'द एक्सपोज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर तिने रितेश देशमुखसोबत 'ग्रेट ग्रँड मस्ती'मध्ये दिसली.'किंगफिशर कॅलेंडर गर्ल'ही राहिली आहे.