Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी'च्या घरात आलेली प्राजक्ता शुक्रे कोण? कंगना राणौतच्या सिनेमासाठी गायलंय गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:37 IST

1 / 7
बिग बॉस मराठीच्या बहुप्रतिक्षित सहाव्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. कलाकार, रील स्टार, युट्यूबर, डान्सर अशा मंडळींनी घरात प्रवेश केला आहे.
2 / 7
राकेश बापट, करण सोनावणे, सागर कारंडे, दीपाली सय्यदसह एकूण १७ जणांना घेऊन बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरु झाला आहे.
3 / 7
या सगळ्या मंडळींमध्ये गोड गळ्याची, घाऱ्या डोळ्यांची प्राजक्ता शुक्रेही आली आहे. प्राजक्ता कोण आहे अनेकांना माहितही आहे. तर काहींना तिची आता नव्याने ओळख होत आहे.
4 / 7
प्राजक्ता ही 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्याच सीझनमध्ये होती. अभिजीत सावंतसोबतच ती यामध्ये होती. अभिजीत सीझनचा विजेता झाला होता. प्राजक्ताने मराठी आणि हिंदीमध्येही गाणी गायली आहेत.
5 / 7
प्राजक्ताला 'धक्का गर्ल' असंही म्हटलं जातं. 'इथून धक्का तिथून धक्का देतोस काय रे' हे लोकप्रिय गाणं प्राजक्तानेच ११ वर्षांपूर्वी गायलं होतं.
6 / 7
कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका' सिनेमातलं 'डंकिला' हे गाणंही लोकप्रिय झालं होतं. प्राजक्तानेच हे गाणं गायलं होतं. तसंच तिने 'वल्हव रे नाखवा' हे जुनं मराठी गाणं रिक्रिएट केलं होतं. तिच्या गाण्याला युट्यूबवर मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.
7 / 7
आता बिग बॉसच्या घरात प्राजक्ता कशी खेळ खेळते की लवकर बाहेर पडते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
टॅग्स :प्राजक्ता शुक्रेबिग बॉस मराठी ६संगीत