Join us

साधी सोज्वळ रमा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, 'मुरांबा' फेम शिवानीचे फोटो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:12 IST

1 / 10
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे मुरांबा. मुरांबा मालिकेला कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली.
2 / 10
मुरांबा मालिकेतील रमा आणि अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. रमाची भूमिका शिवानी मुंढेकर हिने तर अक्षयची भूमिका शशांक केतकरने साकारलीय.
3 / 10
शिवानी मुंढेकरची मुरांबा ही पहिलीच मालिका आहे. तिने या मालिकेतून रसिकांच्या मनात घर केले आहे.
4 / 10
शिवानी मुंढेकरचे या मालिकेनंतर फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ झालीय.
5 / 10
शिवानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
6 / 10
नुकतेच शिवानीने व्हाइट रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
7 / 10
शिवानीने हे फोटोशूट समुद्र किनारी केले आहे.
8 / 10
शिवानी मुंढेकर या फोटोशूटमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.
9 / 10
शिवानी मुंढेकरने या फोटोशूटमध्ये हटके पोझ दिल्या आहेत.
10 / 10
शिवानी मुंढेकरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.