Join us

'एज इज जस्ट अ नंबर'! श्वेता तिवारीने साजरा 'असा' केला वाढदिवस, किती वर्षांची झाली अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 19:11 IST

1 / 10
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वयापेक्षा खूप लहान आणि स्टायलिश दिसते.
2 / 10
तिची २४ वर्षांची मुलगी पलक तिवारी नेहमीच फॅशनेबल स्टाईलमध्ये दिसत असली तरी, आई श्वेताच्या ग्लॅमरपुढे ती अनेकदा फिकी पडते.
3 / 10
अलीकडेच, श्वेता तिच्या कुटुंबासह आणि काही मित्रांसह लोणावळ्याच्या ट्रिपवर गेली होती, जिथे श्वेताचा वाढदिवस साजरा (Shweta Tiwari Birthday Celebration) करण्यात आला.
4 / 10
श्वेता तिवारीचा ४ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो. श्वेतानं तिच्या वाढदिवसाचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले.
5 / 10
या पोस्टमध्ये तिने लिहिले, 'हा वाढदिवस खरोखरच अविस्मरणीय होता. विशेषतः पलक, विकास, पायल आणि श्रेया यांनी खूप प्रेम आणि मेहनत घेऊन तो खास बनवला गेला. माझ्या अद्भुत मित्रांनी मला इतके प्रेम दिलं, त्यासाठी मी शब्दात आभार व्यक्त करु शकत नाही, मी कृतज्ञ आहे. खूप आभार', असं तिनं लिहलं.
6 / 10
या फोटोंमधील श्वेताचा ग्लॅमरस लूक आणखीनच किलर दिसत होता. श्वेता तिवारी आजही आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करते.
7 / 10
श्वेता तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत पूल पार्टी करताना दिसली. तिच्या बर्थडे सेलिब्रेशन फोटो व्हायरल झाले आहेत.
8 / 10
दोन मुलांची आई असूनही श्वेता तिवारी दिवसेंदिवस आणखी सुंदर दिसते आहे. या फोटोत श्वेतासोबत तिची लेक पलक आणि मुलगा रेयांश दिसून येत आहेत.
9 / 10
विशेष म्हणजे श्वेतानं वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा केला. या फोटोत ती एक रोपटं लावताना दिसून येत आहे.
10 / 10
श्वेता तिवारी आता ४५ वर्षांची झाली आहे. मात्र, तिचं सौंदर्य पाहून तिच्या वयाच्या अंदाज लावणे कठीणच होते. आपल्या फॅशन सेन्सनं ती आजही २५ वर्षांच्या तरुणींनाही टक्कर देते.
टॅग्स :श्वेता तिवारीसेलिब्रिटी