Join us

काय सांगता! Shinchan सारखं घर हवं म्हणून त्याने खर्च केले तब्बल 'इतके' कोटी, २१ वर्षांच्या मुलाने कमालच केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:31 IST

1 / 9
टीव्हीवरील लोकप्रिय कार्टुनपैकी एक म्हणजे Shinchan. नटखट शिनचॅन त्याच्या अवखळपणाने पोट धरुन हसवतो.
2 / 9
या Shinchan चे जगभरात चाहते आहेत. पण, Shinchan सारखाच त्याचा एक अवली चाहता आहे ज्याने हुबेहुब कार्टुनसारखं घर बांधलं आहे.
3 / 9
चीनमधील २१ वर्षांच्या जियांगने Shinchanसारखं घर बांधण्यासाठी तब्बल कोटी रुपये खर्च केले आहेत.
4 / 9
Shinchanचा फॅन असलेल्या जियांगला हुबेहुब कार्टुनमध्ये दाखवलंय तसं घर हवं होतं. जुलै २०२४ मध्ये त्याने हे घर बांधायला सुरुवात केली.
5 / 9
पण, घराची जशीच्या तशी प्रतिकृती तयार करण्यासाठी मात्र खास सामानाची जुळवाजुळव करावी लागली.
6 / 9
हुबेहुब Shinchan सारखं घर बांधण्यासाठी तब्बल ४ लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयानुसार, ३.५ कोटींचा खर्च आला आहे.
7 / 9
फोटोंमध्ये Shinchanच्या घराच्या रेप्लिकाची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये घराला हुबेहुब टच द्यायचा प्रयत्न केला गेला आहे.
8 / 9
Shinchanचं हे घर बांधून पूर्ण झाल्यानंतर चाहत्यांसाठी खुलं केलं जाणार आहे. कार्टुनमध्ये दाखवलेलं Shinchanची शाळादेखील जियांगला बांधायची आहे.
9 / 9
ही शाळा त्याला सुरूदेखील करायची आहे. एवढंच नव्हे तर कार्टुनमध्ये दाखवलेलं Kasukabe Town जियांगला बांधायचं आहे.
टॅग्स :व्हायरल फोटोज्