Join us

मुंबईत आतापर्यंत १०० फ्लॅट पाहिले पण घर नाही मिळाले; टीव्ही अभिनेत्रीसमोर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 15:56 IST

1 / 9
टीव्ही अभिनेत्री आकांक्षा जुनेजा हिला मुंबईत फ्लॅट मिळण्यात अडचणी येत आहेत. अभिनेत्रीने स्वत: याचा खुलासा केला आहे. जवळपास 100 फ्लॅट पाहिले असतील पण एकही फ्लॅट फायनल झालेला नाही असं आकांक्षा म्हणाली.
2 / 9
इतकेच नाही तर एका क्षणी जवळपास फिक्स झाले होते. परंतु केवळ सिने इंडस्ट्रीशी पार्श्वभूमी असल्यामुळे तिला तो फ्लॅट मिळू शकला नाही. घरमालकाने मी कोणत्याही कलाकाराला घर भाड्याने देणार नाही असे सांगून नकार दिला असंही आकांक्षानं सांगितले.
3 / 9
अभिनेत्री आकांशा धनादेश घेऊन घरमालकाकडे गेली, पण शेवटच्या क्षणी मालकाने नकार दिला. आकांक्षा जुनेजा प्रसिद्ध टीव्ही सीरियल कुंडली भाग्य मध्ये भूमिका करते. मुंबईत फ्लॅट मिळणे कित अवघड आहे असा अनुभव आकांक्षा एका मुलाखतीत सांगितले.
4 / 9
आकांक्षा मुलाखतीत म्हणाली की, एकदा फोटो पाहून मी फ्लॅट शॉर्टलिस्ट केला होता. यानंतर मी चेक घेऊन मालकाकडे गेले. मात्र, त्याला माझ्या प्रोफेशनची माहिती मिळताच. त्याने लगेच नकार दिला. ते म्हणाले की, आम्ही कलाकारांना फ्लॅट देत नाही.
5 / 9
आकांक्षाने सांगितल्यानुसार, तिला ब्रोकरने आणखी एक अपार्टमेंट दाखवले होते. तिथेही हीच समस्या निर्माण झाली. तेथील मालकानेही व्यवसाय पाहून घर देण्यास नकार दिला. अशा अनेक सोसायट्या आहेत जिथे अभिनेत्यांना घर न देण्याचे कठोर नियम बनवले गेले आहेत असं आकांक्षा म्हणाली.
6 / 9
त्याचसोबत मला समजत नाही की लोक अभिनेते-अभिनेत्री आणि बॅचलरला घर का देत नाहीत. आपण त्यांना त्रास देऊ का? आम्ही नेहमी पार्टी करू? या सर्व गोष्टींमध्ये एखाद्याचा व्यवसाय कसा आडवा येऊ शकतो? मुंबईत एकट्या कलाकारांसाठी घर शोधणे म्हणजे संकटातून जाण्यासारखे आहे असंही आकांक्षाने सांगितले.
7 / 9
आकांक्षा सांगते की, ज्या कलाकारांचे लग्न झालेले नाही किंवा ज्यांना एकटे राहायचे आहे, त्यांना सहजासहजी घर मिळत नाही. मुंबईत आतापर्यंत १०० हून अधिक फ्लॅट बघितले आहेत. परंतु अद्याप तिला हवं तसं घर मिळाले नाही.
8 / 9
आकांक्षा गेल्या महिन्यात ऑनलाइन फसवणुकीची बळी ठरली होती. ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यासाठी तिने अॅपचा वापर केला. त्याचवेळी तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. कॉलरने आकांक्षाला तिच्या ऑर्डरची पुष्टी करण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले.
9 / 9
या लिंकवर आकांक्षाने लिंकवर क्लिक करताच आकांक्षाच्या बँक खात्यातून पैसे कापले जाऊ लागले. तिच्या खात्यातून तीन वेळा १० हजार रुपये कापण्यात आले. अशा स्थितीत तिची एकूण ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.