1 / 9'सावळ्याची जणू सावली' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारून अभिनेत्री प्राप्ती रेडकर घराघरात पोहोचली. 2 / 9मालिकेत शांत स्वभावाची साधी भोळी दिसणारी प्राप्ती खऱ्या आयुष्यात मात्र फारच मॉर्डन आहे. 3 / 9प्राप्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 4 / 9कधी साडी, कधी वन पीसमध्ये प्राप्ती तिच्या अदा दाखवते. तिच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. 5 / 9प्राप्तीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अनेक मालिकांमध्ये काम तिने केलं आहे. 6 / 9'किती सांगायचंय मला','तू माझा सांगाती','मेरे साई' आणि 'काव्यांजली'मध्ये ती महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसली. 7 / 9प्राप्तीचा ५ एप्रिल रोजी वाढदिवस साजरा झाला. ती २२ वर्षांची आहे. 8 / 9अभिनयाबरोबरच प्राप्तीने कराटेचं शिक्षणही घेतलं आहे. तिच्याकडे ब्लॅक बेल्टदेखील आहे. 9 / 9याशिवाय तिने किक बॉक्सिंगचंही शिक्षण घेतलं आहे. ती एक उत्कृष्ट डान्सरही आहे.