Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुमानी खरे-स्तवन शिंदेच्या घरी लग्नाची लगबग; लव्हेंडर ड्रेस अन् हातावर मेहंदी, पाहा रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:36 IST

1 / 7
सध्या मराठी सिनेविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच रेवती लेले, अपूर्वा नेमळेकर लग्नबंधनात अडकल्या.
2 / 7
आता मराठी कलाविश्वातील आणखी दोन अभिनेत्रींच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. कोणी ग्रहमखाचे तर कोणी मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. कोण आहेत या अभिनेत्री?
3 / 7
एकीकडे अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अंशुमन जोशी लग्नबंधनात अजकणार आहेत. अपूर्वाने ग्रहमखाचे फोटो काल पोस्ट केले. तर दुसरीकडे अभिनेत्री रुमानी खरे आणि स्तवन शिंदे यांचीही लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
4 / 7
रुमानी खरेने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. लव्हेंडर रंगाच्या ड्रेसमध्ये रुमानीचं सौंदर्य खुललं आहे. त्यावर तिने साजेशी ज्वेलरी परिधान केली आहे. तसंच तिची हेअरस्टाईलही आकर्षक आहे.
5 / 7
रुमानीच्या दोन्ही हातावर सुंदर मेहंदी काढण्यात आली आहे. तिने क्युट पोज देत मेहंदी फ्लॉन्ट केली आहे.
6 / 7
रुमानीच्या मेहंदीला स्तवनही तिथेच होता. दोघांनी रोमँटिक पोज देत फोटोशूट केलं आहे. तसंच एका व्हिडीओत स्तवन रुमानीला भरवतानाही दिसतो.
7 / 7
रुमानीने 'तू तेव्हा तशी' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर रुमानी दुर्गा मालिकेत झळकली. तर स्तवन शिंदेaopस्टार प्रवाहच्या 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेत झळकला होता. 'जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतही त्यानं काम केलं होतं.
टॅग्स :मराठी अभिनेताशुभविवाह