"ग्रुपिजम, जातीवाद सगळं पाहिलं...", प्राजक्ता माळीचा खुलासा; कसा होता सुरुवातीचा काळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:44 IST
1 / 11प्राजक्ता माळी (Prajakta Mali) महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. आज ती कितीही यशस्वी असली तरी तिने आयुष्यात खूप स्ट्रगल केला आहे. पुणे ते मुंबई हा तिचा प्रवास सोपा राहिलेला नाही. 2 / 11'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता माळी म्हणाली, 'मी आयुष्यात विशेषत: टीएनएजनंतर खूप काही पाहिलं आहे. वयाच्या १७ व्या वर्षांनंतर मी पुढे आयुष्यात एकदम डेंजरस काळ पाहिला. त्यातूनच मी स्ट्राँग मुलगी म्हणून बाहेर पडले.' 3 / 11'मला जाणवलं की इतकं शांत राहिलात तर तुम्ही कुठेच पोहोचू शकणार नाही. छोटंच जग बनून राहील आणि एवढं तर मी राहू शकत नाही. मी इथे आयुष्य जगायला आलीये तर काहीतरी बँग ऑन करुनच जाणार. असं मी मरु शकत नाही.'4 / 11'डेंजर डेंजर ब्रेकअप्स झाले. तसंच मी बरेच संघर्ष मी स्वत:च ओढवून घेतले. माझा पुणे-मुंबई स्ट्रगल खूप मोठा होता. कुटुंबाचा मानसिकरित्या पाठिंबा होता. पण प्रत्यक्षात आजूबाजूला मनुष्यबळ नाही. आजही माझे मुंबईत कोणीही नातेवाईक राहत नाहीत.'5 / 11'मानसिक, भावनिक संघर्ष पाहिला. त्या जोडीला आर्थिक संघर्ष होता. खूप टप्पे टोणपे, धक्के, पाणउतारा, अपमान, ग्रुपिजम, जातीवाद सगळंच पाहिलं. त्यातून मी घडत गेले.'6 / 11'मानसिक, भावनिक संघर्ष पाहिला. त्या जोडीला आर्थिक संघर्ष होता. खूप टप्पे टोणपे, धक्के, पाणउतारा, अपमान, ग्रुपिजम, जातीवाद सगळंच पाहिलं. त्यातून मी घडत गेले.'7 / 11'मेघना जशी हळूहळू रेशीमगाठीत फुलत गेली तर दुसरीकडे नकटी एकदम अशी बिंधास्त होती. त्या भूमिकांनीही मला तसं व्हायला मदत केली. या संघर्षांमुळेच मी बदलले.'8 / 11'पुणे-मुंबई प्रवासाबद्दल सांगायचं तर सुरुवातीला मी 'दम दमा दम'मध्ये परफॉर्म करायला यायचे. मी १३ वेळा त्यात परफॉर्म केलंय. सोनाली बेंद्रेचा 'क्या मस्ती क्या धूम','कुछ कर दिखाना है' अशा शोमध्ये मी स्पर्धक म्हणून परफॉर्म केलं.'9 / 11'तेव्हा पुणे मुंबई एका दिवसात मी प्रवास करायचे. पॅकअप व्हायला रात्रीचे कितीही वाजले अगदी ३ जरी वाजले तरी पुन्हा आम्ही पुण्याला जायचो. कारण हॉटेलमध्ये राहण्यासाठी तेवढे पैसच नव्हते. तेव्हा पुणे-मुंबई खूप वाऱ्या झाल्या.'10 / 11'त्यानंतर मी गुड मॉर्निंग महाराष्ट्र होस्ट करायला घेतलं. मी सेकंड इयरला होते तेव्हा मी कार्यक्रम होस्ट करत होते. तेव्हा मी पहाटे चार ला उठायचे स्वारगेटवरुन बस पकडायचे. ती सायनला सोडायची. दिवसभर ७ एपिसोड्सचं शूट करायचे.' 11 / 11'परत रात्री १० वाजता आई आणि मी चेंबुरला जायचो. तिथून मिळेल ती बस अगदी लाल डब्बा पकडून पहाटे चार पर्यंत पुण्याला पोहोचायचो. तिथे लावलेली टू व्हीलर घेऊन घरी जायचो. असा आमचा २५-२६ तासांचा दिवस व्हायचा. असा तो अख्खा शो मी अडीच वर्ष होस्ट केला. त्या शोमधून मिळालेल्या पैशातून माझं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण झालं.'