Join us

आईला माझं नाव 'लीना' ठेवायचं होतं कारण..., प्राजक्ता माळीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 08:00 IST

1 / 8
प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. फक्त अभिनेत्रीच नाही तर ती बिझनेसवुमन, निर्माती, नृत्यांगना आणि कवयित्रीही आहे.
2 / 8
प्राजक्ताचे वडील सीआयडीचे सेवानिवृत्त पोलिस हवालदार आहेत. तर आई गृहिणी. प्राजक्ताने आईवडिलांबद्दल अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
3 / 8
प्राजक्ताची आई तिच्या अगदी जवळची आहे. नुकतंच एमएचजे अनप्लग्डला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, 'माझी आई माझ्यापेक्षा दहापट एनर्जेटिक आहे. ती अत्यंत जिद्दी आहे.'
4 / 8
आईला माझं नाव लीना ठेवायचं होतं. कारण लीना चंदावरकर नावाच्या अभिनेत्री तिच्या आवडत्या होत्या. माझा चेहरा त्यांच्यासारखा आहे असं सर्वांना वाटायचं.
5 / 8
वडील पोलिस असल्याने आम्ही तेव्हा पोलिस लाईनमध्ये राहत होतो. तर आमच्याच लेनमधील एका घरात तेव्हाच जन्माला आलेल्या मुलीचं नाव त्यांनी लीना ठेवलं. मग माझी आई चिडली. आता मी लेकीचं नाव लीना ठेवणार नाही असं ती म्हणाली.
6 / 8
मग माझं नाव काय ठेवायचं यावर विचार सुरु झाला. तेव्हा आमच्या दारात प्राजक्ताचा सडा पडायचा म्हणून मग आईने माझं नाव 'प्राजक्ता' ठेवलं. तर घरी प्राजक्ताला 'सोनी'असंही म्हणतात.
7 / 8
प्राजक्ताने याच मुलाखतीत तिला एकटं राहायलाही आवडतं असंही सांगितलं. पडद्यावर ती कितीही चुलबुली वाटत असली, आयुष्यात तिचा कितीही मोठा मित्रपरिवार असला तरी ती कुठेतरी एकटीच बसलेली दिसेल अशी ती आहे असं तिने सांगितलं.
8 / 8
प्राजक्ताला पॅन इंडिया वुमन सेंट्रिक फिल्म करायची आहे अशीही इच्छा तिने व्यक्त केली. हाच तिचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचंही तिने सांगितलं.
टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेता