Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळी ते मुक्ता बर्वे; लग्नाचं वय उलटून गेलं तरी या मराठी अभिनेत्री आहेत अविवाहित, का केलं नाही लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:22 IST

1 / 9
मराठी कलाविश्वात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. मात्र कलाविश्वात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या लग्नाचं वय उलटून गेलं तरी अद्याप सिंगल आहेत.
2 / 9
मुक्ता बर्वे : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेली मुक्ता बर्वे अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करते. स्वत:ची कंपनी आवडत असल्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला नसल्याचं तिने सांगितलं होतं. मुक्ता ४६ वर्षांची आहे.
3 / 9
प्राजक्ता माळी : मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा असलेली प्राजक्ता माळी तरुणांची क्रश आहे. मात्र ३६ वर्षांची प्राजक्ता अजूनही सिंगल आहे. अद्याप तिचं लग्न झालेलं नाही.
4 / 9
तेजश्री प्रधान : तेजश्री प्रधानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तेजश्रीदेखील ३७ वर्षांची आहे. तिने शशांक केतकरसोबत लग्न करत संसार थाटला होता. मात्र एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. आता ती सिंगल आहे.
5 / 9
जुई गडकरी : जुई गडकरी म्हणजे मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव. जुई ३७ वर्षांची आहे. मात्र अद्याप तिने लग्न केलेलं नाही.
6 / 9
स्नेहा वाघ: मराठीसोबतच हिंदी कलाविश्व गाजवणारी अभिनेत्री स्नेहा वाघ ३८ वर्षांची आहे. स्नेहाने अविष्कार दार्व्हेकरसोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
7 / 9
२०१५ मध्ये स्नेहाने अनुराग सोळंकीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र तिचं हे लग्नदेखील फार काळ टिकलं नाही. घटस्फोट घेत ते वेगळे झाले. आता स्नेहा सिंगल आहे.
8 / 9
अपूर्वा नेमळेकर : प्रेक्षकांची लाडकी शेवंता अपूर्वादेखील अद्याप सिंगल आहे. अपूर्वा ३७ वर्षांची आहे. तिने २०१४मध्ये रोहन देशपांडेसोबत लग्न केलं होतं. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अपूर्वाने दुसरं लग्न केलं नाही.
9 / 9
अपूर्वा नेमळेकर : प्रेक्षकांची लाडकी शेवंता अपूर्वादेखील अद्याप सिंगल आहे. अपूर्वा ३७ वर्षांची आहे. तिने २०१४मध्ये रोहन देशपांडेसोबत लग्न केलं होतं. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अपूर्वाने दुसरं लग्न केलं नाही.
टॅग्स :प्राजक्ता माळीतेजश्री प्रधान मुक्ता बर्वे