Prajakta Mali : प्राजक्ता म्हणते, "मी शाकाहारी!" अभिनेत्रीने नॉनव्हेज का सोडलं? कारण ऐकून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:28 IST
1 / 7प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री. प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. 2 / 7प्राजक्ता तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना फिदा करते. पण, तुम्हाला माहितीये का प्राजक्ता व्हेजिटेरियन आहे आणि ती नॉनव्हेज खात नाही. 3 / 7प्राजक्ता मांसाहाराला स्पर्शही करत नाही. यामागचं कारणही प्राजक्ताने मुलाखतीत सांगितलं होतं. 4 / 7'नॉनव्हेज पचवण्यासाठी आपल्या शरीराला ७२ तास लागतात. प्राण्यांची पचन संस्था वेगळी असते आणि माणसांची वेगळी असते'. 5 / 7'त्यामुळे मला वाटतं नॉनव्हेज हे माणसांसाठी बनलेलं नाही', असं प्राजक्ता म्हणाली होती. 6 / 7'मी आधी नॉनव्हेज खायचे, मग त्यानंतर सोडलं', असा खुलासा प्राजक्ताने केला होता. 7 / 7हळूहळू व्हिगन होण्याकडे कल असल्याचंही प्राजक्ता बोलली होती. याशिवाय आपल्या मातीत जे पदार्थ पिकतात तेच आपण खाल्ले पाहिजेत असा सल्ला प्राजक्ताने दिला होता.