Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर चेहरा, गोड स्माईल! पूर्वा गोखलेच्या सौंदर्यावर आजही चाहते फिदा, तिच्या नवऱ्याला पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:14 IST

1 / 9
मराठी मालिका विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय चेहरा म्हणजेपूर्वा गोखले. 'कुलवधू' असो किंवा 'स्वराज्यरक्षक संभाजी', पूर्वाने आपल्या साध्या पण प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
2 / 9
सध्या पूर्वा 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत दिसत आहे. किमया ही तिची भूमिका आहे. समर स्वानंदीच्या आयुष्यात तिची एन्ट्री झाली आहे.
3 / 9
पूर्वा आणि सुबोधची जोडी 'कुलवधू' मालिकेत दिसली होती. २००८ साली ही मालिका आली होती जी खूप गाजली. त्यानंतर मध्ये दोघं एका सिनेमात दिसले होते. मात्र त्यात पूर्वाची छोटीच भूमिका होती.
4 / 9
पूर्वा गोखलेचे लग्न केदार गोखले यांच्यासोबत झाले असून ते बिझनेसमन आहेत. त्यांना दोन मुली आहेत.
5 / 9
पूर्वा गोखलेला अभिनयाचं बाळकडू तिच्या आईकडूनच मिळालं आहे. पूर्वा गोखलेच्या आईने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांचं नाव कांचन गुप्ते आहे.
6 / 9
कांचन गुप्ते यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नाटकांप्रमाणेच काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
7 / 9
त्यांनी जावई विकत घेणे आहे, घाडगे अँड सून, माझी नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तुझेच गीत गात आहे मालिकेतही त्या दिसल्या.
8 / 9
पूर्वाने मराठीसोबतच हिंदीतही बरंच काम केलं आहे. 'तुझसे है राबता', 'झनक', 'ये है चाहते' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
9 / 9
पूर्वाचा फिटनेस कमालीचा आहे. वयाच्या चाळीशीतही ती खूप सुंदर दिसते. तसंच तिच्या एका स्माईलवर आजही चाहते घायाळ होतात.
टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार