Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गे लोकांच्या' सतत येणाऱ्या मेसेजमुळे वैतागला होता 'बिग बॉस मराठी ६'चा 'हा' स्पर्धक; म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:27 IST

1 / 10
'बिग बॉस' हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सध्या 'बिग बॉस मराठी ६'ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हे पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे.
2 / 10
'बिग बॉस मराठी ६'मध्ये अनेक चर्चेत राहिलेल्या चेहऱ्यांपैकी एक म्हणजे अभिनेता ओमकार राऊत (Omkar Raut).
3 / 10
ओमकार राऊत एक उत्तम हेअर स्टायलिस्ट आहे. तसेच तो त्याच्या पिळदार शरीरयष्टीमुळे सोशल मीडियावर तरुणांसाठी एक 'फिटनेस आयकॉन' म्हणून ओळखला जातो.
4 / 10
'बिग बॉस'च्या घरात तो एक शांत पण तितकाच खंबीर खेळाडू होता. परंतु कमी मतं मिळाल्याने त्याला 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर जावं लागलं होतं.
5 / 10
नुकतंच 'सर्व काही' या युट्यूब चॅनलला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत ओमकारने त्याच्या 'बिग बॉस' एन्ट्रीबाबत असा काही खुलासा केला आहे, जो ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
6 / 10
ओमकारला जेव्हा 'बिग बॉस'ची ऑफर आली होती, तेव्हा त्याने ती चक्क १५-२० दिवस पाहिलीच नव्हती. तर त्याचं कारण होतं 'गे' (Gay) कम्युनिटीकडून येणारे मेसेजेस. सोशल मीडियावरील मेसेजेसमुळे तो चक्क बिग बॉसची ऑफर गमावणार होता, असे त्याने स्पष्ट केले.
7 / 10
ओमकारने सांगितले की, त्याची एक रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर त्याला इन्स्टाग्रामवर मुलींपेक्षा मुलांचे आणि विशेषतः 'गे' (Gay) कम्युनिटीमधील तरुणांचे मेसेजेस येऊ लागले. अनेक मुले त्याला चक्क 'माझ्याशी लग्न करशील का?' असे विचारत होते. धक्कादायक म्हणजे, यात साधी मुलेच नाही तर 'ब्लू टिक' असलेले व्हेरिफाईड लोकही होते. या सगळ्याला कंटाळून ओमकारने त्याचे मेसेजेस बघणंच बंद केलं.
8 / 10
ओमकार म्हणाला, 'मी इतका वैतागलो होतो की मी डीएम सेक्शन उघडणंच सोडून दिलं. पण याच काळात 'बिग बॉस'ची टीम मला मेसेज करत होती. तब्बल १५-२० दिवस त्यांचा मेसेज माझ्या इनबॉक्समध्ये पडून होता, पण मी तो पाहिलाच नाही'.
9 / 10
जेव्हा बिग बॉसच्या टीमला ओमकारकडून प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा त्यांनी ओमकारशी त्याच्या एका मित्राद्वारे संपर्क साधला. ओमकार म्हणाला, 'मग मी तो बिग बॉसच्या टीमचा मेसेज पाहिला. रात्री दोन वाजता आमचं डिस्कशन झालं. मग मी टीमला भेटलो'.
10 / 10
ओमकारच्या मते, बिग बॉसमध्ये जाण्यासाठी नशीब लागते. तो म्हणाला, 'अनेक प्रसिद्ध ॲक्टर्स आणि इन्फ्लुएन्सर्स वर्षानुवर्षे ट्राय करतात, पण त्यांना संधी मिळत नाही. काही जण तर दोन-तीन वर्षांपासून मागे लागलेले असतात, तेव्हा त्यांना एन्ट्री मिळते. पण मला पहिल्याच प्रयत्नात ही संधी मिळाली, म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान मानतो'.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६