Join us  

मृणाल कुलकर्णी यांच्या सुनेचा लुक व्हायरल, शिवानीची पहिली मकर संक्रांत खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 1:30 PM

1 / 8
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. मराठीतील या क्युट कपलचे फोटो सध्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 8
लग्नानंतर दोघांची ही पहिलीचच संक्रांत आहे. शिवानीचा मकर संक्रांती लुक सध्या व्हायरल होतोय. काळ्या साडीत शिवानी खूपच सुंदर दिसत आहे.
3 / 8
मकर संक्रांत म्हणलं की हलव्याचे दागिने हे आलेच. संपूर्ण हलव्याचाच हार,कानातले, नथ , बांगड्या असा तिचा पारंपारिक लुक आहे. हा लुक पाहून चाहत्यांनी देखील शिवानीचे खूप कौतुक केले आहे.
4 / 8
तर विराजसने काळा कोट परिधान केला आहे. त्यानेही गळ्यात हलव्याचा हार घातला आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर पसंत केले जात आहेत.
5 / 8
दोघांनी फोटो शेअर करत चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा, गोड च बोला असे कॅप्शन शिवानीने दिले आहे.
6 / 8
शिवानी आणि विराजस हे कपल कॉलेजमध्येच असतानाच एकमेकांच्याच प्रेमात पडले. यानंतर शिवानीने मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली तर विराजसने दिग्दर्शनात पाऊल ठेवले.
7 / 8
शिवानी बन मस्का मालिकेतून घराघरात पोहोचली तर विराजस नुकताच माझा होशील ना या मालिकेतून त्याने अभिनयात पदार्पण केले.
8 / 8
शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची सून. सासू सुनेमध्ये सुद्धा किती सुंदर बॉ़ंड आहे हे सुद्धा अनेकदा फोटोंमधून दिसलं आहे.
टॅग्स :मराठी अभिनेताशिवानी रांगोळेविराजस कुलकर्णीमृणाल कुलकर्णी