Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँकेची नोकरी सोडली अन् अभिनेत्री झाली! खलनायिका साकारून सगळ्यांची हवा टाईट केली, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 17:29 IST

1 / 7
अभिनयाच्या चंदेरी दुनियेत नाव कमावण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. त्यासाठी अनेक कलाकार मुंबईत दाखल होतात. मात्र, त्यातील मोजकेच कलाकार असतात जे या चंदेरी दुनियेत यशस्वी ठरतात. कलाविश्वात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो.
2 / 7
अथक परिश्रम आणि मेहनतीने मनापासून एखादं काम केलं की सर्वकाही शक्य होतं, असं म्हटलं जातं. जोपर्यंत एखादी व्यक्ती रिस्क घेत नाही, तोपर्यंत ती यशस्वी होऊ शकत नाही. अशीच एक अभिनेत्री जिने बँकेची नोकरी सोडून अभिनयाची वाट धरली. तर कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया....
3 / 7
'ती परत आलीय', 'चंद्र आहे साक्षीला' तसेच 'स्वामिनी यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी नायिका म्हणजे कुंजिका काळविंट.
4 / 7
कुंजिकाने छोट्या पडद्यावर विविध धाटणीच्या भूमिका साकारून चाहत्यांचं प्रेम मिळवलं आहे. अलिकडेच ती स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेत दिसली. या मालिकेत तिने खलनायिकेच पात्र साकारून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
5 / 7
परंतु, तुम्हाला माहितीये का? अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी कुंजिका एका बँकेत नोकरी करायची. अलिकडेच 'स्वामी कृपा'क्रिएशन ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याविषयी खुलासा केला.
6 / 7
या मुलाखतीत आपल्या अभिनय प्रवासाविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली,'मी श्रावण क्वीन नंतर सुद्धा बॅंकेत काम करत होते. शिवाय त्याच्यानंतरही मला मालिका किंवा चित्रपटांमध्ये काम करायचं, असं वाटत नव्हतं. कारण तेवढा आत्मविश्वास नव्हता. कॉलेजनंतर ते बॅंकेतील माझं नॉर्मल लाईफ चालू होतं. या ब्रेकमध्ये मी थोडीशी मागे पडले होते.'
7 / 7
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली,'पण, मग नंतर एका पॉईंटला असं जाणवलं की हे सगळं शक्य नाही आहे. कारण या क्षेत्रात काम करायचं असेल कर पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे, जसं मी बॅंकेत करत होते. जर मला करिअर म्हणून हे क्षेत्र निवडायचं असेल. तरीही मी अधून-मधून ऑडिशनला जायचे. त्यानंतर माझा पहिला ब्रेक होता 'एक निर्णय' हा चित्रपट होता.' दरम्यान, या चित्रपटात सुबोध भावेंसोबत कुंजिकाने स्क्रिन शेअर केली होती.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी