Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासवे आहेस तू, मजला पुरे ही सार्थता...! प्रसिद्ध मराठी कपलचा विवाहसोहळा, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:39 IST

1 / 9
मराठी मालिका विश्वातील लाडकी अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि 'शाळा' फेम अभिनेता शुभंकर जोशी काल लग्नबंधनात अडकले.
2 / 9
दोघांनी सोशल मीडियावर लग्नातील बरेच फोटो पोस्ट केले आहेत. चेहऱ्यावर आनंद, डोळ्यात पाणी अशा भावना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
3 / 9
अपूर्वा आणि शुभंकरचा हा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. हात जोडून दोघंही अंतरपाटासमोर उभे आहेत. त्यांच्या हातात हार आहेत. तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू, आनंद सर्वकाही सांगून जात आहे.
4 / 9
त्यांच्या लग्नाच्या अल्बममधील हा सर्वात खास फोटो म्हणावा लागेल. यामध्ये अपूर्वा अतिशय भावुक झाली असून शुभंकरला मिठी मारुन रडत आहे.
5 / 9
हातात हात धरून घेतलेले हे फोटो पुढील सुंदर आयुष्याची साक्ष देत आहेत. त्यांच्यात आनंदात नातेवाईक मित्रमंडळी सहभागी झाले आहेत.
6 / 9
लग्नात वधू वराच्या आउटफिटनेही लक्ष वेधलं. अपूर्वाने गडद पिवळ्या आणि केशरी रंगाची रेशमी नऊवारी साडी परिधान केली होती ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
7 / 9
तर शुभंकर जोशी देखील अत्यंत देखणा दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा सिल्क कुर्ता आणि त्यावर भरजरी काठ असलेले उपरणे परिधान केले होते. डोक्यावर पारंपारिक फेटा आणि कपाळावर टिळा अशा पेहरावात शुभंकरचा लूक पूर्णपणे साजेसा होता.
8 / 9
'माझ्यासवे आहेस तु, मजला पुरे ही सार्थता…!' असं गोड कॅप्शन अपूर्वाने फोटोंना दिलं आहे. चाहत्यांनी त्यांच्या या फोटोंवर प्रेमाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
9 / 9
'आई कुठे काय करते' या मालिकेतून अपूर्वा घराघरात पोहोचली, तर शुभंकरनेही आपल्या अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता हे रील लाईफमधील कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार बनले आहेत.
टॅग्स :मराठी अभिनेताशुभविवाह