Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' अभिनेत्री आहेत मावस बहिणी! इंडस्ट्रीतील 'हा' कलाकार आहे त्यांचा भाऊ; ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 16:26 IST

1 / 10
अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत.
2 / 10
पण कदाचित रसिकांनाच खऱ्या आयुष्यात हे अभिनेता-अभिनेत्री एकमेकांचे सख्खे भाऊ बहिणी आहेत ते फारसं कुणाला ठाऊक नाहीत. मराठी कलाविश्वात असंच एक मावस भावंडांचं त्रिकुट आहे ज्यांच्याबद्दल फार कोणाला माहिती नाहीये.
3 / 10
अभिनेत्री सोनाली खरे, माधवी निमकर आणि 'चला हवा येऊ द्या' फेम संगीतकार तुषार देवल हे एकमेकांचे सख्खे मावस भावंड आहेत. ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे.
4 / 10
या रंजक नात्याचा खुलासा तुषार देवल आणि त्याची पत्नी अभिनेत्री स्वाती देवल यांनी एका मुलाखतीत केला होता. विशेष म्हणजे, स्वाती देवल आणि सोनाली खरे या बालपणापासूनच्या जीवलग मैत्रिणी आहेत
5 / 10
स्वाती आणि सोनाली त्या एकाच शाळेत, एकाच बेंचवर बसायच्या आणि एकाच डान्स क्लासलाही जायच्या. मात्र, लग्नापर्यंत स्वातीला ही कल्पना नव्हती की, तिची सर्वात जवळची मैत्रीण सोनाली ही तिच्या पतीची (तुषारची) सख्खी मावस बहीण आहे. लग्नानंतर जेव्हा हे गुपित उलगडले, तेव्हा स्वातीलाही मोठा धक्का बसला होता.
6 / 10
सोनाली खरे आणि माधवी निमकर या सख्ख्या मावस बहिणी आहेत, तर तुषार देवल हा त्यांचा मावस भाऊ आहे. सध्या ही तिन्ही भावंडं आपापल्या क्षेत्रात सक्रिय आहेत.
7 / 10
सोनाली खरे ही सध्या 'स्टार प्रवाह'वरील 'नशीबवान' मालिकेत 'उर्वंशी' ही खलनायिकेची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
8 / 10
माधवी निमकर ही 'तुझ्या सोबतीने' मालिकेत 'तायडी' या नकारात्मक भूमिकेत झळकत असून तिच्या कामाची मोठी चर्चा होत आहे.
9 / 10
तुषार देवलने आजवर अनेक लोकप्रिय गाण्यांचे संगीत संयोजन केले असून 'चला हवा येऊ द्या'मधून तो घराघरात पोहोचला आहे.
10 / 10
याशिवाय, तुषारची पत्नी स्वाती देवल सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 'मंगल' ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीसोनाली खरे