Join us

प्रसिद्ध लेखकाची नात आहे 'ही' अभिनेत्री! गाजवतेय मराठी मालिकाविश्व, तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:34 IST

1 / 7
देखणा चेहरा, भाषेची उत्तम जाण, भाषेचा ऐकावासा लहेजा, कणखर आवाजाची देण लाभलेल्या अभिनेत्री म्हणजे संयोगिता भावे.
2 / 7
मराठीसह हिंदी कलाविश्वातही त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3 / 7
'उंच माझा झोका'मधली सुभद्रा काकू, मंथरा या त्यांच्या गाजलेल्या भूमिका. आजवर त्यांनी साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिका विशेष गाजल्या.
4 / 7
प्रसिद्ध लेखक य. गो. जोशी यांची हे त्यांचे आजोबा आहेत.
5 / 7
पण आजोबांच्या नावाचा स्वत:ची ओळख करून देण्यासाठी आणि काम मिळवण्यासाठी त्यांनी कधीच उपयोग करून घेतला नाही.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
6 / 7
संयोगिता भावे सध्या छोट्या पडद्यावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत त्यांनी साकारलेलं वसू आत्याचं पात्र चांगलंच चर्चेत आहे.
7 / 7
लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, ऋजुता देशमुख, अविनास नारकर तसेच विजय आंदळकर,विवेक सांगळे, कश्मिरा कुलकर्णी अशा कलाकारांची फौज आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया