Join us

मराठी अभिनेत्रीचं पहिल्यांदाच बिकिनी फोटोशूट; नेटकरी म्हणाले, "तुझ्याकडून अपेक्षा नव्हती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:34 IST

1 / 9
मराठी मनोरंजनविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या बोल्ड अँड बिंधास्त लूकमुळे ओळखल्या जातात. अनेकदा अभिनेत्रींना कपड्यांवरुन ट्रोलही केलं जातं.
2 / 9
नुकतंच एका अभिनेत्रीने लाल बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. समुद्रकिनारी तिने व्हिडिओही शूट केला आहे. यामध्ये ती बिकिनीत कमालीची सुंदर आणि हॉट दिसत आहे.
3 / 9
मात्र काही नेटकऱ्यांनी तिला मराठी संस्कृतीची आठवण करुन देत ट्रोल केलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
4 / 9
'तुझ्यावाचून करमेना' मालिकेतून पदार्पण केलेली आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' मुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav). 'बिग बॉस मराठी ४' मध्येही ती सहभागी झाली होती.
5 / 9
रुचिरा सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे बोल्ड आणि सुंदर फोटोशूट व्हायरल होत असतात. आता तिने लाल बिकिनीमध्ये समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे.
6 / 9
यात तिने टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे. तसंच तिच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचंही कौतुक होत आहे. या महिन्यात रुचिराचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिने 'वाढदिवसाच्या महिन्यात एन्ट्री...ड्रामा, स्पार्कल्स आणि फक्त ग्लो' असं कॅप्शन दिलं आहे.
7 / 9
यात तिने टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे. तसंच तिच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचंही कौतुक होत आहे. या महिन्यात रुचिराचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिने 'वाढदिवसाच्या महिन्यात एन्ट्री...ड्रामा, स्पार्कल्स आणि फक्त ग्लो' असं कॅप्शन दिलं आहे.
8 / 9
रुचिराचं हे फोटोशूट अनेकांना आवडलं आहे. पण काही नेटकऱ्यांनी तिला यावरुन चार शब्द सुनावले आहेत. 'ही अपेक्षा नव्हती तुमच्या कडून','आहेत ते कपडेही काढून महाराष्ट्राची लाज काढ' अशा संतप्त कमेंट्सही व्हिडिओवर आल्या आहेत.
9 / 9
तर रुचिराच्या चाहत्यांनी मात्र तिचं कौतुक करत तिचा आत्मविश्वास वाढवला आहे. रुचिराने पहिल्यांदाच बिकिनीमध्ये व्हिडिओ पोस्ट केला आहे.
टॅग्स :मराठी अभिनेताव्हायरल फोटोज्ट्रोल