Join us

रेशम टिपणीसची हुशार मुलं; लेकीचा स्वत:चा व्यवसाय, तर मुलगा...; 'या' क्षेत्रात करतात काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:04 IST

1 / 8
शाहरुख खानच्या 'बाजीगर' सिनेमात अंजली या छोट्या भूमिकेतही मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस (Resham Tipnis) लक्षात राहिली होती. मराठी, हिंदी कलाविश्वातील ती लोकप्रिय चेहरा आहे.
2 / 8
रेशमने 'श्रीमान श्रीमती','तू तू मै मै','साहेब बीवी और बॉस' या मालिकांमधूनही अभिनयाचा ठसा उमटवला. बिग बॉस मराठी च्या पहिल्या सीझनमधून ती पुन्हा प्रसिद्धीझोतात आली होती.
3 / 8
रेशम टिपणीसने १९९३ साली वयाच्या २० व्या वर्षी हिंदी अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केलं होतं. संजीव सेठ तेव्हा ३२ वर्षांचे होते. दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर होतं.
4 / 8
लग्नानंतर वर्षभरातच रेशमला मुलगी झाली. तिचं नाव रिशिका. काही वर्षांनी तिने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव मानव आहे. रेशम अनेकदा मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते.
5 / 8
रेशमची मुलगी रिशिका ३१ वर्षांची असून खूप टॅलेंटेड आहे. तिने फोटोजर्नलिझमचं शिक्षण घेतलं आहे. शिवाय काही म्युझिक अल्बमचं दिग्दर्शनही केलं आहे.
6 / 8
तिची स्वत:ची अॅडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. तिचा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा स्वत:चा ब्रँडही आहे. फोटोग्राफर, लेखिका, कंटेंट क्रिएटर अशी रिशिकाची बहुगुणी ओळख आहे. तिच्या सोशल मीडियावर तिने केलेल्या फोटोशूटची झलक दिसते.
7 / 8
तर रेशमचा मुलगा हा मानवने व्हिडिओ एडिटिंगचं शिक्षण घेतलं आहे. तो एका कंपनीत व्हिडिओ कंटेंट एडिटर आहे. तसंच तो ग्राफिक डिझायनर आहे.
8 / 8
रेशम टिपणीस काही वर्षांपासून संदेश किर्तीकरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. सध्या ती 'प्यार की राहे' या मालिकेत काम करत आहे. तसंच 'वस्त्रहरण' या नाटकाचे प्रयोगही करत आहे.
टॅग्स :रेशम टिपणीसमराठी अभिनेता