Join us

लेकाच्या जन्मानंतर एका वर्षातच मराठमोळ्या अभिनेत्रीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:54 IST

1 / 8
मराठमोळी अभिनेत्री राधा सागर (Radha Sagar) लोकप्रिय आहे. 'आई कुठे काय करते' गाजलेल्या मालिकेत ती दिसली होती.
2 / 8
२०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात राधा सागरने मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर अनेकदा ती सोशल मीडियावर लेकासोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
3 / 8
दरम्यान राधाच्या जबरदस्त ट्रॉन्सफॉर्मेशनवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. तिच्या फिटनेसवरुन चाहते तिचं कौतुक करत आहेत. पहिल्या बाळाच्या जन्मानंतर एका वर्षातच तिने स्वत:ला चांगलं मेंटेन केलं आहे.
4 / 8
नुकतंच राधाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सच्या वर्षाव केला आहे. गडद पर्पल रंगाच्या रेडिमेड साडीत तिने फोटो शेअर केले आहेत.
5 / 8
तिची हेअरस्टाईलही छान केली आहे. तसंच एचडी मेकअपमुळे तिच्या चेहऱ्यावर कमालीचा ग्लो आला आहे. सिल्व्हर कानातले सौंदर्यात भर घालत आहेत
6 / 8
या लूकमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. या सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे तिची टोन्ड फिगर पाहून तिला एक वर्षाचा मुलगा आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही.
7 / 8
न्यू इयर न्यू मी...असं कॅप्शन तिने दिलं आहे. २०२५ वर्षाचं स्वागत करत तिने तिचा हा लूक शेअर केला आहे.
8 / 8
राधाच्या छोट्या पडद्यावरील कमबॅकची चाहते वाट पाहत आहेत. ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार का याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं आहे. सौजन्य-radhasagarofficial instagram page
टॅग्स :मराठी अभिनेतासोशल मीडियाटिव्ही कलाकार