Join us

सौंदर्याची खाण प्राजक्ता गायकवाडचा साज श्रृंगार, साखरपुड्याच्या फोटोंवरुन नजरच हटणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:30 IST

1 / 8
'स्वराज्यरक्षक संभाजी' , 'आई माझी काळुबाई' या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad). तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे.
2 / 8
प्राजक्ताने दोन दिवसांपूर्वी कुंकवाचा कार्यक्रम अशी पोस्ट करत सर्वांना सुखद धक्काच दिला होता. साखरपुडा ठरल्याची आनंदाची बातमी तिने चाहत्यांसोबत शेअर केली. मात्र होणारा नवरा कोण? हे तिने गु्पितच ठेवलं होतं.
3 / 8
काल ७ ऑगस्ट रोजी प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा झाला. प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा अखेर समोर आला. प्राजक्ताच्या आयुष्यात एक सुंदर योगायोगच जुळून आला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज आहे.
4 / 8
मालिकेत प्राजक्ताने छत्रपती संभाजीराजांच्या पत्नीची महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. आता तिला खऱ्या आयुष्यातही शंभुराज मिळाले आहेत. शंभुराज खुटवड असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे.
5 / 8
साखरपुड्याला प्राजक्ता गायकवाडने सुंदर लूक केला होता. लाल काठ असलेली पांढरी डिझायनर साडी, हिरव्या रंगाची आकर्षक ज्वेलरी, सुंदर हेअरस्टाईल, ग्लोई मेकअप असा तिचा लूक आहे.
6 / 8
प्राजक्ताच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत आहे. भर मंडपात तिचा डान्स करतानाचा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोड हास्याने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.
7 / 8
प्राजक्ताचा होणारा नवरा शंभुराजही दिसायला हँडसम आहे. त्यानेही क्रीम रंगाची शेरवानी, पारंपरिक टोपी असा लूक केला आहे. त्याच्या शेरवानीवर प्राजक्ता असं नक्षीकामही केलेलं दिसत आहे.
8 / 8
प्राजक्ताच्या या लूकवर आणि तिच्या साखरपुड्याच्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी कमेंट करत तिला कॉम्प्लिमेंट दिली आहे. तसंच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो सौजन्य - Prajakta Gaikwad Instagram account
टॅग्स :प्राजक्ता गायकवाडमराठी अभिनेता