कोण आहे ही अभिनेत्री? स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:10 IST
1 / 7स्टार प्रवाहवर 'नशिबवान' ही नवी मालिका सुरु होतेय. या मालिकेतून एक नवा चेहरा समोर आला आहे. ही अभिनेत्री कोण? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.2 / 7या अभिनेत्रीचं नाव आहे नेहा नाईक(Neha Naik). 'नशिबवान' मालिकेत ती दिसणार आहे. यामध्ये अभिनेते अजय पूरकर खलनायकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याच मुलीच्या भूमिकेत नेहा नाईक झळकत आहे.3 / 7नेहा नाईक सिनेमांमध्येही दिसली आहे. दिग्पाल लांजेकरांच्या 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या सिनेमात ती संत मुक्ताबाईंच्या भूमिकेत दिसली होती. या सिनेमातही तिच्यासोबत अजय पुरकर होते. 4 / 7या सिनेमासाठी नेहाची १५० तरुणींमधून निवड झाली होती. संत मुक्ताईच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती. 5 / 7नेहा रंगभूमीवर विशेष कार्यरत आहे. पुण्यात राहत असतानाच तिचा रंगभूमीशी संबंध आला. तिच्या अभिनयाची ताकद तिने या सिनेमातून दाखवली होती.6 / 7याशिवाय नेहाने 'नाव तुझं काय?' या शॉर्टफिल्ममध्येही काम केलं आहे. अभिनेता उमेश कामत तिच्यासोबत या शॉर्टफिल्ममध्ये झळकला होता. 7 / 7नेहा व्हॉइस ओव्हर आर्टिस्टही आहे. तसंच ती काही जाहिरातींमध्येही दिसली आहे. आता मालिकेत मुख्य भूमिकेत झळकण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे.