Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सुंदरीचा थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर जलवा, बिकिनीतल्या फोटोंनी वेधलं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:35 IST

1 / 10
फोटोत दिसणारी ही बोल्ड अभिनेत्री म्हणजे मिरा सारंग आहे. मिरा नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.
2 / 10
थायलंडच्या समुद्रकिनारी नियॉन रंगाची बिकिनी घालून अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
3 / 10
मिराने इन्स्टाग्रामवर थायलंड व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
4 / 10
या फोटोशूटला मीराने 'शेवटच्या वेळेस हे क्षण मनसोक्त अनुभवत आहे. ही सुट्टी इतकी सुंदर आणि अविस्मरणीय बनवल्याबद्दल धन्यवाद थायलंड' असे कॅप्शन दिले आहे.
5 / 10
मीराने स्वीमिंग पूलमधील खास फोटो फोटो शेअर केले आहेत. तिनं काळा गाॅगलही लावत खास पोझ दिल्यात.
6 / 10
पाण्यात तिला मिळणारा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. तिचा हा लूक पाहून चाहते प्रेमात पडलेत.
7 / 10
या फोटोंमध्ये मिरा सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेताना दिसतेय. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर तिनं सुंदर फोटोशूट केलं आहे.
8 / 10
मिराने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. डोक्यावर हॅट आणि डोळ्यांवर गॉगल लावत तिने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
9 / 10
मीरा सारंगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत 'जान्हवी मुकादम' पात्र साकारलं होतं. या मालिकेमुळे तिला अधिक लोकप्रियता मिळाली.
10 / 10
मीरानं 'जागो मोहन प्यारे', 'काव्यांजली', 'दुनियादारी फिल्मी ईश्टाईल' आणि 'श्री लक्ष्मी नारायण' यांसारख्या विविध मालिकांमध्येही काम केलं आहे. तसेच अनेक जाहिरातींमध्येही ती दिसली आहे.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी