1 / 9सुमारे ९ वर्षांपूर्वी आलेली 'पुढचं पाऊल' मालिका खूप गाजली होती. हर्षदा खानविलकर आणि जुई गडकरीची यामध्ये मुख्य भूमिका होती.2 / 9नंतर मालिकेत जुईनंतर नव्या कल्याणीची एन्ट्री झाली. तिनेही आपल्या निरागस अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.3 / 9ही अभिनेत्री आहे माधुरी देसाई. माधुरीला स्टार प्रवाहच्या 'येक नंबर'मालिकेतील वेदा देशमुखने या भूमिकेनेही ओळख मिळवून दिली होती. 4 / 9याशिवाय माधुरी महेश मांजरेकरांच्या 'एफयु' सिनेमातही दिसली. त्यात आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होता. 5 / 9माधुरी उत्तम डान्सरही आहे. ती कथ्थक या नृत्यप्रकारात पारंगत आहे. तसंच तिने यात डिप्लोमा केला आहे. शिवाय तिने फार्मामध्ये एमबीए पूर्ण केलं आहे.6 / 9गेल्या काही वर्षात माधुरी कंटेंट क्रिएटर म्हणून प्रसिद्धीझोतात आली. तिचे विनोदी रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.7 / 9२०२२ साली माधुरीने अमेरिकेतील बॉयफ्रेंडशी लग्न केलं आणि ती तिथेच स्थायिक झाली. त्याचं नाव अंशुल काय असं आहे. माधुरीचे वेडिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 8 / 9माधुरी आता अमेरिकेतूनही सोशल मीडियावर कंटेंट रील्स बनवत असते. भारत आणि अमेरिकेत राहण्याचा एकंदर फरकावरुन ती मजेशीर रील करते.9 / 9मधल्या काळात माधुरीने नवऱ्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. मात्र यात तिने नवऱ्याचा चेहराच गायब केला होता आणि त्याचं फक्त धड दिसत होतं. यावरुन ती चांगलीच ट्रोल झाली होती.