Join us
Daily Top 2Weekly Top 5

लगीनघटिका समीप आली! मराठी अभिनेत्रीच्या घरी लग्नसराई; पोस्ट केले ग्रहमखाचे सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:13 IST

1 / 9
गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकरांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. काहींनी प्रेमाची कबुली दिली तर काहींनी थेट लग्नगाठच बांधली.
2 / 9
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेवती लेलेनेही प्री वेडिंग फोटोशूट पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. यात तिने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा लपवला आहे.
3 / 9
तर आता दोघांच्या घरी लग्नसराईला सुरुवात झाली आहे. रेवतीने ग्रहमखाचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
4 / 9
वाईन रंगाची काठपदराची साडी, त्यावर बुट्टे, मॅचिंग ब्लाऊज आणि त्यावर नक्षीकाम असा तिचा सुंदर लूक आहे.
5 / 9
डोई मुंडावळ्या, सोन्याचे दागिने, हातात पाटल्या आणि हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. कलश डोक्याला लावताना हा सुंदर फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
6 / 9
या लूकमध्ये रेवती कमालीची सुंदर दिसत आहे. त्यात तिची गोड स्माईल घायाळ करणारी आहे.
7 / 9
रेवतीच्या ग्रहमखाला तिचे सर्व कुटुंबीय दिसत आहेत. आई, वडील, भावंडांसोबत तिने फोटो काढले आहेत.
8 / 9
कुटुंबासोबतच्या या कँडीड फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. रेवतीच्या या पोस्टवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
9 / 9
अजूनपर्यंत रेवतीने त्याचा चेहरा रिव्हील केलेला नाही. त्यामुळे रेवतीचा होणारा नवरा नक्की आहे तरी कोण याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
टॅग्स :मराठी अभिनेतालग्न