Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तिसरी पत्नी हो, १० एकर जमीन, दरमहा ११ लाख देतो" २९ वर्षीय अभिनेत्रीला अब्जाधीशाची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:43 IST

1 / 10
फिल्म इंडस्ट्रीत, मॉडेलिंगच्या झगमगत्या दुनियेची एक काळी बाजूही आहे, याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. अनेक सौंदर्यवतींना याबाबत उघडपणे सांगितलं सुद्धा आहे.
2 / 10
अलिकडेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिला आलेल्या धक्कादायक अनुभवाबाबत खुलासा केलाय. या अभिनेत्रीला एका मोठ्या अब्जाधीशानं अतिशय वाईट मागणी केलेली, जी ऐकून तिलाही धक्का बसला होता.
3 / 10
आम्ही ज्या प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, तिचं नाव एमी नूर टिनी. अभिनेत्रीनं खुद्द हा थरारक अनुभव शेअर केला आहे.
4 / 10
एमीने सफवान नाझरीच्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, ही घटना २०१९ मधील आहे. त्यावेळी ती केवळ २३ वर्षांची होती. अभिनेत्रीनं त्या अब्जाधीश व्यक्तीचे नाव उघड केलं नाही.
5 / 10
एमी एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप शोधत होती. यादरम्यान, एका अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तीने तिला मदतीचा हात पुढे केला, तिच्या करिअरला पूर्ण आर्थिक पाठबळ देण्याची तयारी दर्शवली. पण त्यामागे एक भयानक अट होती. ती म्हणजे तिने त्याची तिसरी पत्नी बनावे.
6 / 10
एमीनं खुलासा केला की, त्या व्यक्तीनं १० एकर जमीन, आलिशान बंगला, महागड्या गाड्या, दरमहा सुमारे ११ लाख रुपये इतका मासिक भत्ता देण्याचं आमिष दाखवले.
7 / 10
एमीने सांगितले की, एवढी मोठी रक्कम आणि संपत्ती समोर असूनही तिच्या आईने आणि तिने क्षणाचाही विचार न करता ही ऑफर धुडकावून लावली.
8 / 10
एमी म्हणाली, 'माझ्या आईचा नकार ठाम होता: ती मला विकून टाकणार नव्हती'.पॉडकास्टमध्ये, एमीने असेही उघड केले की, जोडीदाराची प्रचंड संपत्ती तिच्यासाठी महत्त्वाची नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जबाबदार आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असावा.
9 / 10
पुढे ती म्हणाली, 'जर तो 'आयर्न मॅन'सारखा दिसत असेल तर मी विचार करेन, पण जर तो आजोबांसारखा दिसत असेल, तर माझं उत्तर 'नाही'च आहे'.
10 / 10
एमी नूर टिनी ही मलेशियन अभिनेत्री, टीव्ही होस्ट, मॉडेल, उद्योजिका आणि ब्युटी क्वीन आहे. ती मिस इको इंटरनॅशनल २०१९ हा किताब जिंकल्यामुळे विशेष ओळखली जाते.
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनमलेशिया