Join us

"दिग्दर्शकाने १ लाख देऊन मला विकलं, पुढे निर्मात्याने खोलीत नेऊन.."; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By देवेंद्र जाधव | Updated: July 14, 2025 16:12 IST

1 / 7
मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊचचे अनेक धक्कादायक प्रकार घडत असतात. एका अभिनेत्रीने असाच धक्कादायक खुलासा केला आहे. जेव्हा एका दिग्दर्शकाने तिला १ लाखांसाठी विकलं होतं.
2 / 7
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे खुशी मुखर्जी. खुशीने एका मुलाखतीत सांगितलं की, 'एका डायरेक्टरने मला मीटिंगसाठी बोलावलं. मी एकटीच त्याच्या ऑफिसमध्ये गेले. काही वेळाने तो मला एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला.'
3 / 7
पुढे हा दिग्दर्शक खुशीला घेऊन एका निर्मात्याकडे गेला. दिग्दर्शकाने आधीच त्या निर्मात्याकडून एक लाख रुपये घेतले होते. 'तू आज रात्री माझ्यासोबत राहणार आहेस', असं तो निर्माता खुशीला म्हणाला
4 / 7
हे ऐकताच खुशीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने स्पष्टपणे त्या निर्मात्याला नकार दिला. काही समजण्याआधी खुशी तिथून निघाली आणि तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला.
5 / 7
खुशीचा मित्र त्यावेळी मुंबईत होता. ती खूप घाबरली होती. मित्रानेच खुशीचं घरी जायचं तिकिट काढून दिलं. अशाप्रकारे या विचित्र प्रसंगातून खुशीची सुटका झाली.
6 / 7
या प्रसंगामुळे खुशी नाउमेद झाली. ती मानसिकरित्या खचली. तिने अनेक वर्ष या प्रसंगाबद्दल कोणाशीही काही संवाद साधला नव्हता.
7 / 7
खुशीने आता हा प्रसंग सांगितल्याने अनेकांना सावध केलं आहे. नवोदित अभिनेत्रींना या क्षेत्रात अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो, अशावेळी त्यांनी सावध राहाण्याचा सल्ला तिने दिलाय.
टॅग्स :कास्टिंग काऊचटिव्ही कलाकारटेलिव्हिजनबॉलिवूड