Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या बिझनेसमनशी थाटात केलं होतं लग्न; करिश्मा तन्नाच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:43 IST

1 / 9
करिश्मा तन्ना हिंदीतल्या काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
2 / 9
आज करिश्माच्या लग्नाला ४ वर्ष पुर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त करिश्मानं सोशल मीडियावर त्यांचे खास फोटो शेअर केले आहेत.
3 / 9
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये करिश्माने वरुणचं आपलं प्रेम व्यक्त केलं. 'Happy 4 Lover' अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
4 / 9
हे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
5 / 9
आज चार वर्षांनंतरही या जोडीमधील केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ घालत आहे.
6 / 9
करिश्मा तन्नानं ५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईतील बिझनेसमन आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधली होती.
7 / 9
करिश्मा गुजराती आहे. तर वरुण हा दक्षिण भारतीय आहे. त्यांच्या लग्नात या दोन्ही संस्कृतींचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला होता.
8 / 9
करिश्मा तन्नानं टेलिव्हिजन, चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. याशिवाय करिश्मा अनेक रिअॅलिटी शोचा भाग बनली आहे.
9 / 9
तिने 'नच बलिये', 'बिग बॉस ८', 'झलक दिखला जा' आणि 'खतरों के खिलाडी १०' मध्ये भाग घेतला होता. 'खतरों के खिलाडी'मध्ये तिने ट्रॉफीचा मान पटकावला होता.
टॅग्स :करिश्मा तन्ना