Jiya Shankar : "ही वेळ देखील निघून जाईल"; आईची तब्येत बिघडताच जिया शंकरच्या मेंटल हेल्थवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 19:37 IST
1 / 10'बिग बॉस ओटीटी 2' फेम जिया शंकरने सोशल मीडियावर मेंटल हेल्थ आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल केल्यावर आलेल्या अनेक आव्हानांबद्दल खुलासा केला आहे. जिया शंकर तिचे प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. 2 / 10अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना तिच्या आईच्या हॉस्पिटलायझेशनबद्दल सांगितलं होतं, त्यानंतर जियाने 11 एप्रिल रोजी तिच्या चाहत्यांना तिची आई बरी झाल्याचं आनंदाने सांगितलं आणि त्यांच्या सपोर्टबद्दल त्यांचे आभार मानले.3 / 10अलीकडील ट्विटमध्ये, जिया शंकरने प्रत्येक वेळी तिची मानसिक स्थिती कशी सुधारली याबद्दल बोलली आणि 'ही वेळ देखील निघून जाईल' यावर जोर दिला आहे. 4 / 10काही दिवसांपूर्वीच जियाने चाहत्यांना तिच्या आईच्या प्रकृतीबद्दल सांगितले होते आणि त्यांच्या प्रार्थना आणि सपोर्टसाठी सर्वांचे आभार मानले होते. जियाचे असंख्य चाहते आहेत. 5 / 10'मला हे देखील आठवत नाही की गेल्या काही दिवसांत मी कितीवेळा मानसिकरित्या तुटली आणि अशी पद्धतीने नॉर्मल झाली जसं काही झालंच नाही' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. 6 / 10 याशिवाय जिया शंकरने तिच्या मागील पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'हाय फॅमिली, आशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल. आज तो दिवस आहे जेव्हा माझी आई शेवटी बरी होत आहे आणि तिला बरं वाटत आहे.'7 / 10'आरोग्यांपेक्षा काहीही मोठं नाही हे समजून घ्या आणि प्रार्थना केव्हाही चमत्कार करू शकते यावर विश्वास ठेवा. मी सदैव ऋणी राहीन आणि या कठीण काळात आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्व लोकांसाठी सदैव तत्पर राहीन. हर हर महादेव.'8 / 10जिया शंकरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तिच्या अदांवर चाहते फिदा होतात. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 9 / 1010 / 10