मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड अदा, 'या' स्टार कुटुंबाची होणार सून?; रिलेशनशिपमुळे आलेली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:36 IST
1 / 8मराठी मनोरंजनविश्वातही ग्लॅमरची कमी नाही. अनेक मराठी अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर आपल्या बोल्ड अदांनी लक्ष वेधून घेत आहेत. 2 / 8'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री ईशा संजयचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आहे. तिचा कधीही न पाहिलेला लूक यामध्ये दिसत आहे.3 / 8मालिकेत राजश्री या सरळ साध्या मुलीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री ईशा. खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे.4 / 8व्हाईट-ब्लॅक प्रिंटेड हाय स्लीट वनपीसमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत. बीचवर एके ठिकाणी बसून तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.5 / 8वाऱ्यावर उडणारे ओले मोकळे केस, पायात पैंजण, गळ्यात नाजूक अशा लूकमध्ये ती एकदम बोल्ड आणि हॉट दिसत आहे. 'सजना अनाडी बेईमान' असं कॅप्शन तिने दिलं आहे. 6 / 8ईशाच्या या फोटोंवरुन नजरच हटत नाहीये. चाहत्यांनीही कमेंट करत तिच्या सौंदर्याचं आणि बोल्ड अदांचं कौतुक केलं आहे. 7 / 8मराठी मनोरंजनविश्वातील एव्हरग्रीन कपल अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेय नारकरला ईशा डेट करत आहे. ईशा अनेकदा अमेयसोबत फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असते. गेल्या काही वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत.8 / 8तसंच ईशाचा होणाऱ्या सासूशी म्हणजेच ऐश्वर्या नारकरांशीही छान बाँड आहे. त्यांच्यासोबतही फोटो अनेकदा फोटो शेअर केले आहेत.