'मन उडू उडू झालं'मधील इंद्रा आणि दीपूचं पार पडलं लग्न; फोटो होतोय व्हायरल, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 13:22 IST
1 / 10'झी मराठी' (zee marathi) वरील मन उडू उडू झालं(Man Udu Udu Jhala) या मालिकेनं सुरूवातीपासून रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दीपू यांची जोडी भलतीच लोकप्रिय ठरली. 2 / 10सुरुवातीपासूनच मालिकेचा टीआरपी ही चांगला आहे, असे असले तरी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 3 / 10इंद्रा आणि दीपू यांच्या विवाह सोहळ्याने हा शेवट होईल.4 / 10 त्यामुळे मालिकेत नुकतीच त्यांची हळद पार पडली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.5 / 10नुकताच इंद्रा आणि दीपूच्या लग्न सोहळ्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.6 / 10दरम्यान आता इंद्रा आणि दीपूचे लग्न पार पडले असून या सोहळ्यातील फॅमिली फोटो समोर आला आहे.7 / 10इंद्रा आणि दीपूच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.8 / 10इंद्रा आणि दिपूच्या लग्नाचा थाट प्रेक्षकांना येत्या रविवारी संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळेल. 9 / 10मन उडू उडू झालं ही मालिका बंद होणार असून मालिकेत दिपूची भूमिका हृता दुर्गुळेनं तर इंद्राची भूमिका अजिंक्य राऊतने बजावली आहे. दोघांच्याही भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे.10 / 10सोशल मीडियावर सध्या या मालिकेविषयी चर्चा होताना दिसते आहे. या मालिकेने सुरू झाल्यापासून टीआरपीच्या स्पर्धेतही विविध मालिकांना मागे टाकले होते. आता मालिका संपणार म्हटल्यावर चाहतेही भावनिक झाले आहेत.