Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यानिमित्त मराठी अभिनेत्रींच्या सौंदर्याचा पारंपरिक साज; फोटोंवर चाहत्यांनी दर्शवलं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:36 IST

1 / 8
अभिनेत्री तितीक्षा तावडेने गुढीपाडव्यानिमित्त खास फोटोशूट केलं आहे. तितीक्षाने खास साडी नेसून गुढी उभारली आहे.
2 / 8
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी गुढीपाडव्यानिमित्त केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे. हिरवी साडी, नाकात नथ अशा खास पारंपरिक साजात ऐश्वर्या खूप सुंंदर दिसत आहेत
3 / 8
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक साजात फोटो शेअर केले आहेत. जांभळ्या साडीत सोनालीचं सौंदर्य खुललं आहे
4 / 8
लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने गुढीपाडव्यानिमित्त साध्या सोज्वळ अंदाजात फोटोशूट केलंय. ज्ञानदाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे
5 / 8
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीवने गुढीपाडव्यानिमित्त हिरव्या साडीत खास फोटोशूट केलंय. सायलीचं सौंदर्य या साडीत खुलुन आलंय
6 / 8
कमळी मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री विजया बाबर डोंबीवलीतील शोभायात्रेत सहभागी झाली होती. विजयाची झलक बघण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.
7 / 8
तुला जपणार आहे मालिकेतील अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर डोंबीवलीतील शोभायात्रेत तिच्या सहकलाकारांसह सहभागी झाली होती. लाल साडीत प्रतीक्षाच्या सौंदर्याला चार चाँद लागले.
8 / 8
शुभ श्रावणी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री वल्लरी विराज डोंबीवली येथील शोभायात्रेत सहभागी झाली होती. पिवळ्या रंगाच्या साडीत वल्लरीचं सौंदर्य खुलुन आलं.
टॅग्स :ऐश्वर्या नारकरतितिक्षा तावडेसायली संजीवगुढीपाडवा 2026गुढीपाडवा