Join us

एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 09:34 IST

1 / 8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहेत. अमृता यांचा अनेक सामाजिक कार्यक्रमात सहभाग असतो.
2 / 8
पेशाने बँकर असलेल्या अमृता या एक उत्कृष्ट सिंगर आहेत. त्यांनी अनेक गाणी गायली असून चाहत्यांच्याही ती पसंतीस उतरली आहेत.
3 / 8
अमृता यांनी नुकतीच 'द कर्ली टेल्स' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं.
4 / 8
या मुलाखतीत त्यांना 'एक दिवस देवेंद्र फडणवीसांसोबत लाइफ स्वॅप करण्याची म्हणजेच मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर सगळ्यात आधी काय कराल?' असा प्रश्न विचारण्यात आला.
5 / 8
अमृता फडणवीसांनी या प्रश्नाचं अगदीच मन जिंकणारं उत्तर दिलं.
6 / 8
त्या म्हणाल्या, 'देवेंद्रजींनी एवढं सगळं काम केलं आहे की त्यामुळे संधी फारच कमी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात त्यांनी इन्फ्रा डेव्हलपमेंट केली आहे'.
7 / 8
'त्यांनी भष्ट्राचाराला आळा घातला आहे. ज्यामुळे लोक आता भष्ट्राचार करायला घाबरतात कारण त्यांना भीती वाटते की आपण पकडले जाऊ. त्यांनी अनेक प्रोजेक्टचाही विचार केलेला आहे'.
8 / 8
'पण, जर मी एक दिवस मुख्यमंत्री झाले तर मी सुट्टी घेऊन माझी पत्नी आणि मुलीला घेऊन चांगल्या ठिकाणी वेळ घालवण्यासाठी जाईन', असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
टॅग्स :देवेंद्र फडणवीसअमृता फडणवीस