Join us
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनला गोवा सांगून दुसऱ्याचं ठिकाणी फिरवलं, मराठी अभिनेत्रीला नवऱ्यानेच फसवलं; नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 15:53 IST

1 / 10
लग्न ठरले की लोकांना हनिमूनची स्वप्ने पडू लागतात. लग्नाच्या काही दिवस आधी हनिमूनला कुठे जायचं, हे ठरवलं जातं. हनिमून हे जोडप्यांसाठी सर्वात सुंदर क्षण आहे, जिथे ते एकमेकांना समजून घेतात आणि भावनिकरित्या कनेक्ट होऊ शकता.
2 / 10
पण, तुम्हाला माहितेय, एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला तिच्या नवऱ्याने गोवा सांगून दुसऱ्याच ठिकाणी हनिमूनला नेलं होतं. अभिनेत्रीनं स्वत: तिच्या हनिमूनचा किस्सा सांगितला.
3 / 10
तर ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून दीपाली सय्यद आहे. दीपाली सध्या 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात आहे.
4 / 10
नुकत्याच झालेल्या 'व्हॅलेंटाईन डे' विशेष भागात अभिनेत्री दीपाली सय्यद हिने आपल्या लग्नानंतरच्या हनिमूनचा एक असा भन्नाट किस्सा सांगितला. जो ऐकून घरातील सदस्यांसह प्रेक्षकही पोट धरून हसलेत.
5 / 10
लग्नानंतर हनिमूनला गोवा सांगून नवरा चक्क गोराईला घेऊन गेला होता, असं दीपाली यांनी सांगितलं. गोवा समजून दीपाली या दोन दिवस नवऱ्यासोबत गोराईत फिरल्या.
6 / 10
दीपालीने या मजेशीर आठवणीला उजाळा देताना सांगितले की, 'लग्न झाल्यावर मला फिरायला जायचं होतं. नवऱ्यानं मला विचारलं, तुला कुठे फिरायचं आहे. मी म्हटलं की मला गोवा बघायचं आहे. त्यांनीही लगेच हो म्हटलं. आम्ही बाईकवरून खूप लांबून फिरत फिरत एका रिसॉर्टवर गेलो. तिथे छान फिरलो, बीचचा आनंद घेतला'.
7 / 10
खरी गंमत तेव्हा घडली जेव्हा ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका दुकानावर कोल्ड्रिंक घ्यायला गेले. दीपाली म्हणाल्या, 'मी दुकानाबाहेर नाव वाचलं 'गोराई'. मला वाटलं हे गोव्यातलं काहीतरी ठिकाण असेल. मी नवऱ्याला विचारलं आपण कुठे आहोत? तो म्हणाला, गोव्यात. मग मी दुकानदाराला विचारलं हे ठिकाण काय आहे, कुठे आहे. तो म्हणाला गोराईत आहात तुम्ही. म्हणजे मी गोवा समजून दोन दिवस गोराईत फिरत होते'
8 / 10
हा किस्सा सांगताना दीपाली यांनी आपल्या पतीला (बॉबी) लटक्या रागानं उद्देशून म्हटलं, 'मी आजही सांगते, तुम्ही मला तेव्हा उल्लू बनवलं होतं. गोवा सांगून चक्क गोराईला घेऊन गेले होतात'.
9 / 10
हा किस्सा सांगताना दीपाली पुढे म्हणाल्या, 'ठिकाण कोणतंही असो, आम्ही ते दोन दिवस खूप एन्जॉय केले. गोवा असो की गोराई, एकत्र आनंद घेणं महत्त्वाचं आहे. आय लव्ह यू बॉबी'.
10 / 10
सध्या 'बिग बॉस मराठी'चं घर गाजवत असेल्या दीपाली या अभिनयाबरोबरच राजकारणातही सक्रिय आहेत. हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम करुन त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.
टॅग्स :दीपाली सय्यदबिग बॉस मराठी ६