Join us
Daily Top 2Weekly Top 5

टॅलेंटेड आहे 'सावल्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीची लेक, लवकरच इंडस्ट्रीत करणार पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:49 IST

1 / 10
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मेघा धाडे बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचली. ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. मेघाचा फॅन फॉलोव्हिंग खूप जास्त आहे.
2 / 10
मेघाने मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनय कौशल्याने आपला ठसा उमटवला आहे. यासोबतच ती राजकारणातही सक्रीय आहे.
3 / 10
सध्या अभिनेत्री झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावली मालिकेत पाहायला मिळते आहे. तिचे स्वतःचे रत्नागिरीमध्ये रिसॉर्टदेखील आहे.
4 / 10
अभिनेत्रीप्रमाणेच तिची लेकही मल्टीटॅलेंडेट आहे आणि ती लवकरच सिनेविश्वात पदार्पण करणार आहे.
5 / 10
मेघा धाडेच्या लेकीचं नाव साक्षी पावसकर असून तीदेखील आईप्रमाणेच सुंदर आहे.
6 / 10
साक्षीला शाळेत असल्यापासूनच चित्रकलेची आवड होती. दहावी नंतर तिने फाईन आर्टसचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने सिनेमा निर्मितीचे धडे गिरवले. हे धडे गिरवल्यानंतर साक्षीने एक शॉर्टफिल्म बनवली होती ज्यात मेघा धाडे यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
7 / 10
अभिनेते अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग स्कूलमधून साक्षीने अभिनयाचा डिप्लोमा देखील केला आहे. गेल्या वर्षभरात तिने रिसॉर्टचा बिजनेस देखील सांभाळला आहे.
8 / 10
इतकंच नाही तर ती केक, कुकीजसारखे बेकरी प्रॉडक्ट्सदेखील उत्तम बनवते. भविष्यात काही जरी नाही झालं तरी ती स्वतःची बेकरी सुरू करू शकेल आणि तो बिजनेस ती उत्तम सांभाळेल असा विश्वास मेघा धाडेला आहे.
9 / 10
रिसॉर्टच्या कामकाजामुळे साक्षीचे अभिनयाकडे थोडे दुर्लक्ष झाले. मात्र तिचे बॉलिवूडसाठी ऑडिशन देणे सुरू आहे.
10 / 10
त्यामुळे लवकरच साक्षी बॉलिवूडमध्ये पाहायला मिळू शकते.
टॅग्स :मेघा धाडे